IMPIMP

संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले -‘असे आंडू-पांडू खूप आले’

by pranjalishirish
such andu pandu came roots maharashtra lot sanjay raut got angry sambhaji bhide

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत, असं वक्तव्य केलं आहे. सांगलीत बोलताना संभाजी भिडे यांनी कोरोना हा रोग नसून, कोरोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत, असे म्हटले. तसेच जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. कोरोनावरुन सरु करण्यात आलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा, असे मत संभाजी भिडेंनी व्यक्त केले. संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut  यांनी संताप व्यक्त करत टीका केली आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

राज्यात कोरोना लसीकरणावरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना संभीजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. संजय राऊत Sanjay Raut  यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर म्हटले, भाजपचे एक विचारक आहे, त्यांनी कोरोनाने मरणाऱ्या लोकांबद्दल अपशब्द वापरले आहेत. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा शब्दात राऊत यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. आतादेखील शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर पळता भूई थोडी होईल, असेही राऊत म्हणाले.

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

काय म्हणाले संभाजी भिडे ?

देशात सर्वत्र सुरु असलेल्या खेळखंडोबाला केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही जबाबदार आहेत. कोरोना हा रोगच अस्तित्वात नाही. ज्याचे त्याचे आयुष्य प्रत्येकाच्या स्वाधिन आहे. लोक स्वत:च्या आरोग्याबाबत पाहून घेतील. सरकारने या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही. हातावरची पोटं असलेली किती लोकं या लॉकडाऊनमध्ये मेली. किती लोक बेरोजगार झाले. याची फिकीर कोणाला नाही. रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांना लाठीने मारले जाते आणि दारुच्या दुकानात गर्दी करणाऱ्यांना सोडले जाते. सर्व व्यापार बंद ठेवून दारुची दुकाने सुरु ठेवता, हा काय प्रकार आहे.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

देशात सर्वत्र बावळट, नेभळट प्रजा असल्यामुळे कोरोनाचा आक्रोश सुरु आहे. लॉकडाऊनची गरज नाही. लोकांचे आरोग्य लोकांवर सोडून द्या, आणि सरकारने त्यांचा कारभार योग्य पद्धतीने करावा. दारु, मावा, मटका, चरस, गांजा सर्व मोकाट, आणि एकत्र येऊन मुलांनी खेळायचे नाही. व्यायाम करायचा नाही हा महामुर्खपणा आहे. मास्क लावण्याने काहीही होत नाही. त्यामुळे मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. लष्करी जवानांना मास्क घालून लढायला सांगायचे का, जिथे मरण्यासाठी लढायचे आहे, तिथे मास्कची गरज नाही, असे भिडे म्हणाले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Related Posts