IMPIMP

‘हे सरकार पडेल आणि 4 महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल’

by bali123
sudhir mungantiwar

सरकारसत्ता ऑनलाइन – हे सरकार पडेल आणि 4 महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( sudhir mungantiwar ) यांनी केलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत आम्हाला आलं होतं. महाविकास आघाडी बेईमानी करत सत्तेत आली आहे. त्याचा त्यांना गर्व झाला आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अन्यायकारक सरकार टिकवणं हीसुद्धा आमच्या हातून मोठी घोडचूक होईल, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar ?
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राचा नंबर आहे. भाजपचं मिशन महाराष्ट्र सुरू झालं आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. शुभकार्य कधी ना कधी होणार आहे. हे सरकार 3-4 महिन्यांत पडेल. 4 महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘बहुमत आम्हाला होतं, मात्र हे सरकार बेईमानीनं सत्तेत आलं आहे’
पुढं बोलताना मुनगंटीवार म्हणाले, बहुमत आम्हाला होतं. मात्र हे सरकार बेईमानीनं सत्तेत आलं आहे. अन्यायकारक सरकार टिकवणं हीसुद्धा आमच्या हातून मोठी घोडचूक होईल. जनहित विरोधी सरकारविरोधात लढावंच लागेल असंही त्यांनी सांगितलं.

‘कोशीश करने वालों की हार नही होती’
मुनगंटीवार असंही म्हणाले, जो होता है वह… हे आता सांगण्याचं कारण नाही. अन्याय वाढतो तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. वीजबिल, शेतकऱ्यांवर अधिवेशनात चर्चाच झाली नाही. भाजप लवकरच सत्तेत येईल. कोशीश करने वालों की हार नही होती, असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

‘मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारे विरोधक अन्वय नाईक प्रकरणात गप्प का?’ अन्वय यांच्या पत्नी आणि मुलीचा संतप्त सवाल

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

Related Posts