IMPIMP

‘मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारे विरोधक अन्वय नाईक प्रकरणात गप्प का?’ अन्वय यांच्या पत्नी आणि मुलीचा संतप्त सवाल

by bali123
anvay naiks wife and daughter questions bjps silence slams devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अन्वय anvay naik यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. यामध्ये त्यांनी अन्वय नाईक anvay naik आत्महत्या प्रकरण दाबण्यात आल्याचा गंभीर आरोप फडणवीस सरकारवर केला. तसेच उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तातडीने तपास करण्यात येतो. त्या प्रकरणी लगेच कारवाई होते. मग अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेले दोषी तीन वर्षे उलटूनही मोकाट कसे फिरतात? असा सवाल अन्वय यांच्या पत्नी आणि मुलीनं उपस्थि केला आहे. तसेच मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटरवर जिलेटिननं भरलेली गाडी सापडल्यावर विधानसभेत आक्रमक होणारा, गदारोळ करणारा पक्ष आमच्या प्रकरणात शांत का?, असा सवालदेखील या मायलेकींनी उपस्थित केला आहे. तसेच या मायलेकींनी मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून सीडीआर काढणारे आमच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करत आहेत? गुन्ह्यातील आरोपी तुमचे नातेवाईक आहेत का? न्याय केवळ श्रीमंतांनाच मिळणार का ? असे अनेक प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले आहेत.

काय आहे प्रकरण
अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ अन्वय नाईक यांनी उभारून दिला होता. त्याचे पैसे थकवले, तसेच गोस्वामींच्या धमक्यांमुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाला ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. पण अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, पोलिसांचं तोंड काळं झालं असं फडणवीस बोलतात. असे बोलणे फडणवीस यांना शोभतं का, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या सरकारने अन्वय नाईक प्रकरण दाबल्याचे अधिवेशनात म्हटले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. मागील सरकारच्या कार्यकाळामध्ये आरोपींना अटकदेखील झाली नव्हती. आरोपींना पोलीस मुख्यालयात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली आहे असे आम्हाला सांगण्यात आले आहे. आरोपींना इतकी स्पेशल ट्रीटमेंट कशी दिली? आणि ती कोणाच्या आदेशावरून दिली गेली?असे सवाल उपस्थित करून त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लक्ष्य केले आहे.

फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘संपूर्ण जग घेतंय ‘सामना’ची दखल’

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

Related Posts