IMPIMP

ODI World Cup | आयसीसीचा मोठा निर्णय ! वनडे वर्ल्डकप आता अधिक रोमांचक होणार, जाणून घ्या नेमकं काय होणार

by nagesh
ODI World Cup | ODI world cup will be more exciting now icc has made big decision know more

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ODI World Cup | आयसीसीने (ICC) काही दिवसांपूर्वी 2024 ते 2031 या काळात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले होते. सध्या टी-20 विश्वचषकाची (T-20 World Cup) लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वनडे विश्वचषक (ODI World Cup) अधिक रोमांचक व्हावा यासाठी आयसीसीने मोठे पाऊल उचलत 2027 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेत 10 ऐवजी 14 संघ खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील टॉप 10 संघ क्रमवारीनुसार थेट पात्र ठरतील. तर उर्वरित 4 संघ क्वालिफायरमधून स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकामध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी वनडे सुपर लीग (World Cup Super League) खेळवली जाणार आहे. तसेच लहान संघांना मोठ्या स्पर्धेशी जोडण्यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. 2023 च्या वर्ल्डकपसाठी सुरू करण्यात आलेल्या सुपर लीगमध्ये 12 संघासोबत नेदरलँड्सच्या (Netherlands) संघाला संधी देण्यात आली आहे. या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघ 8 मालिका खेळेल. त्यातील 4 मालिका मायदेशात आणि चार मालिका ह्या परदेशात खेळवण्यात येणार आहे. मात्र हा नियम 2027 च्या विश्वचषकासाठी संघाची संख्या वाढवण्यासोबतच संपुष्टात येणार आहे.

दरम्यान 2027 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी (ODI World Cup) करण्यात आलेल्या बदलाला मान्यता देण्यात आली आहे.
2027 च्या विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया या देशांना देण्यात आले आहे.
या बदलानुसार, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये एकूण 14 संघ खेळवण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- ODI World Cup | ODI world cup will be more exciting now icc has made big decision know more

 

 

हे देखील वाचा :

Atal Pension Yojana | मोदी सरकारची ‘ही’ स्कीम पती-पत्नीसाठी ‘फिक्स्ड इन्कम’चे माध्यम, दरमहिना मिळतील रू. 10,000; जाणून घ्या कसे?

Japanese long lives | गोड पदार्थ आणि चपाती वर्ज्य, जाणून घ्या जपानी लोकांच्या दिर्घायुष्याची ‘ही’ 10 रहस्य

IND vs NZ | 17 नोव्हेंबर, 17 नंबरची जर्सी, 17 चेंडूवर 17 धावा, 2017 मध्ये पदार्पण; तुम्हाला माहित आहे का Love 17 असलेल्या खेळाडूचे नाव

 

Related Posts