IMPIMP

…म्हणून 60 पेक्षा कमी वय असताना देखील सुप्रिया सुळेंना देण्यात आली ‘कोरोना’ लस

by sikandershaikh
supriya-sule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली आहे. त्यावेळी जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह काही डॉक्टर पवारांसोबत उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी लस घेतल्यानंतर त्यांनी जनतेलासुद्धा लस टोचून घेण्याचे आवाहन केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आज देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या टप्पयातील लसीकरणाला सुरुवात झाली. हि लस ६० वर्षांवरील नागरिकांना आणि ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी देण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात तर शरद पवार यांनी मुंबईत जे.जे.रुग्णालयात कोरोना लस घेतली आहे. शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ‘कोव्हिशिल्ड’ लस टोचण्यात आली.

यांनतर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (supriya sule) यांनीसुद्धा हि कोरोना लस टोचून घेतली.
मात्र सुप्रिया सुळे यांचं वय 60 नसताही त्यांना कोरोनाची लस का देण्यात आली हा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात येत होता.
त्यावेळी, सुप्रिया सुळे यांना शुगर आणि उच्च रक्तदाब असल्याने त्यांनी कोरोनाची लस दिल्याची माहिती
वैद्यकीय सुत्रांकडून देण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे यांना रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी लस दिली.
तसेच सामान्य नागरिकांनी नोंदणी करुन लस अवश्य टोचून घ्यावी ही विनंती, असे आवाहन सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

कोरोना लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले नेते

कोरोना प्रतिबंधक लस घेणारे शरद पवार हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले तर हि लस टोचून
घेणाऱ्या सुप्रिया सुळे या पहिल्या महिला नेत्या ठरल्या आहेत.
देशात आजपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांवरील वयोगटातील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.

Video : बाळाला दूध पाजताना दिसली रिंकू राजगुरू ! सोशलवर जोरदार व्हायरल झाला व्हिडीओ

Related Posts