IMPIMP

‘दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करायची, हे कोणतं राजकारण सुरु आहे ?’, संजय राऊतांचा मराठी मंत्र्यांना सवाल

by pranjalishirish
the ruling marathi minister is sitting in delhi and defaming maharashtra sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यात कोरोना लसीवरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जोरदार राजकारण सुरु झाले आहे. यावरुन आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut  यांनी भाजप आणि खासकरुन केंद्रातील मराठी मंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, एक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की ते सगळी लोक एकत्र येत होती. आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत होते, हे मी स्वत: पाहिले आहे. मात्र आताचे चित्र उलटं आहे. आता सत्तेतील आपले मराठी मंत्री महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच दिल्लीच्या सरकारमध्ये बसून आपल्याच राज्याची बदनामी करायची, हे कोणतं राजकारण सुरु आहे ? असा सवाल देखील राऊत यांनी केला आहे.

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

याला अमानुष राजकारण म्हणतात

महाराष्ट्रात लसींचा तुटवडा भासत असून,या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. यावर बोलताना राऊत Sanjay Raut यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, लस ही माणसाला या क्षणी जीवनावश्यक गोष्ट आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, लस उत्सव साजरा करा. जागृती होण्यासाठी आणि महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे, का ?  तर इथे भाजपचं राज्य नाही. या ठिकाणी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. याला अमानुष राजकारण म्हणतात, असे राऊत म्हणाले.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली

उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त लसीचा पुरवठा केला आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या असताना त्यांना एक कोटी लसी देण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींची आवश्यकता असताना, 8 लाख लसींचाही पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली जात आहेत, असा आरोप राऊत Sanjay Raut  यांनी केला.

संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले -‘असे आंडू-पांडू खूप आले’

किमान 105 आमदारांसाठी लस घेऊन या

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही, तुम्ही आणू नका. भाजपचे जे आमचे सहकारी आहेत, ते कालपर्यंत इथले राज्यकर्ते होते. त्यांचे देखील 105 आमदार या राज्यातील जनतेने निवडून दिले आहेत. त्याचे तरी भान ठेवून त्यांच्यासाठी तरी किमान लस घेऊन यायला हवी, आमचं आम्ही बघू. महाराष्ट्र जेवढा आमचा आहे तेवढा तुमचा देखील आहे, असेही राऊत म्हणाले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Related Posts