IMPIMP

प्रकाश आंबेडकरांची PM मोदींवर टीका, म्हणाले – ‘…म्हणून मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं’

by sikandershaikh
prakash-ambedkar-narendra-modi

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) भारत-इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईपर्यंत जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपास आलेल्या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं ओळखलं जात होतं. परंतु बुधवारी सामन्यापूर्वी झालेल्या उद्घाटन समारंभात या स्टेडियमला देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं नाव देण्यात आलं. या सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी केलं. दरम्यान या स्टेडियमला पीएम मोदींचं नाव दिल्यानंतर अनेकांनी यावर जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) चे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही यावरून सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत याबाबत भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, काय नेता मिळाला आहे या देशाला. लोक यांना विसरून जातील याची यांना चिंता आहे. यांना लोकांवर भरवसा नाहीये की, मृत्यूनंतर कोणी त्यांची आठवण ठेवेल. त्यामुळंच मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं असं ते म्हणाले आहेत.

आंबेडकरांनी (prakash ambedkar) शेअर केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे.

‘…म्हणून स्टेडियमला मोदींचं नाव’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) याबाबत बोलताना म्हणाले, हे स्टेडियम मोदी यांचं स्वप्न होतं.
आम्ही या स्टेडियमला पंतप्रधानांचं नाव देण्याचं निश्चित केलं.
या भव्य परिसरात भविष्यात राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा आणि ऑलिम्पिक स्पर्धांचंही आयोजन करता येऊ शकेल.
पुढील 6 महिन्या हे संपूर्ण क्रीडा संकुल तयार होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आता पुन्हा उडाला LPG सिलेंडरच्या दरवाढीचा ‘भडका’; वाचा आजचा दर काय ?

Related Posts