IMPIMP

BJP MLA | भाजप आमदाराकडून अधिकारी पत्नीचा छळ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

by bali123
Web Title :-BJP MLA | husband slapped three times wife accused harassing bjp mla

सिमला : वृत्तसंस्था – BJP MLA | हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) प्रशासनिक सेवेत असणाऱ्या महिला अधिकारी ओशिन शर्मा (Oshin Sharma) यांनी पती हिमाचल प्रदेशातील धर्मशालाचे भाजप आमदार विशाल नेहरिया (BJP MLA Vishal Nehria) यांनी आपला शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार केली आहे. ओशिन शर्मा यांचा ११ मिनिटांचा एक व्हिडीओ व्हयरल (Video viral) होत असून गुरुवारी आमदार पतीने आपल्याला तीन थप्पड मारल्याचे म्हंटले आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. BJP MLA | husband slapped three times wife accused harassing bjp mla

ओशिन शर्मा या २०२०च्या एचपीएएस बॅचच्या (HPAS batch) अधिकारी असून सध्या कांगडा जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीच्या (डीआरडीए) नगरोट सूरियानमधील विभागीय विकास अधिकारी (Development Officer) म्हणून शर्मा कार्यरत आहेत. ओशिन शर्मा यांनी केवळ थप्पड मारल्याचेच म्हंटले नाही तर नेहरिया यांनी त्यांना अनेकदा शारीरिक व मानसिकरीत्या छळले आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी म्हणजे २६ एप्रिलला नेहरिया व शर्मा यांचा विवाह (Marriage) झाला होता. कोरोनाबाधित झाल्यामुळे विवाहानंतर चौथ्याच दिवशी पटीने घराबाहेर काढले. त्यानंतर, त्यांनी स्वत:ला जखम करून घेण्याची धमकीही दिली होती. फेब्रुवारीमध्येही चंडीगडच्या एका हॉटेलमध्ये नेहरिया यांनी मारहाण केल्याचे शर्मा यांनी म्हंटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘सासरकडील लोकांनी हुंड्यासाठीही छळ केला’

ओशिन शर्मा आणि विशाल नेहरिया हे दोघे एकमेकांना महाविद्यालयीन शिक्षणापासून ओळखत आहे.
त्यावेळीही नेहरिया यांनी मारहाण केली होती.
त्यामुळे दोघांमधील संबंध संपुष्टात आले होते.
मात्र २०१९ मध्ये नेहरिया आमदार झाले आणि त्यांनी शर्मा यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला.
दोघांचा विवाह झाला. मात्र आता सासरचे लोक हुंडा मागत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

Web Title : Web Title :-BJP MLA | husband slapped three times wife accused harassing bjp mla

Related Posts