IMPIMP

विनायक मेटेंचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल, म्हणाले- ‘पूजा चव्हाण प्रकरणात उद्धव ठाकरेंची नेमकी मजबुरी काय ?’

by sikandershaikh
what-compulsion-uddhav-thackeray-pooja-chavan-case-vinayak-metens-angry-question

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची नेमकी मजबुरी काय असा सवाल त्यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं उदाहरण देत शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या 15 दिवस गायब असण्यावर देखील टीका केली.

उद्धव ठाकरेंची नेमकी कोणती मजबुरी आहे ?

विनायक मेटे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरेंनी बाजूला ठेवले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी आरोप झालेल्या मंत्र्यांना तासभरही पदावर ठेवलं नसतं. उद्धव ठाकरेंची नेमकी कोणती मजबुरी आहे ? सगळ्या जगाला माहित आहे, कोण बोलतोय, कोणत्या भाषेत बोलतोय, याचा अर्थ सरकारला नीतीमत्ता राहिलेली नाही.

पुढं बोलताना मेटे म्हणाले, पूजाची हत्या की आत्महत्या (pooja chavan suicide case) हे चौकशीत समोर येईल.
परंतु पोलीस ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळत आहेत, त्यांच्या चौकशीवर माझा विश्वास नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत:हून पूजा चव्हाण प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी द्यावं.

संजय राठोड यांच्या गायब राहण्यावरून टीका करताना मेटे म्हणाले, धनंजय मुंडे त्यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर स्वत:हून पुढं आले.
ते 15 दिवस लपून बसले नाहीत अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं.

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्याचं नाव, काँग्रेसचा ‘गौप्यस्फोट’

Related Posts