IMPIMP

Supriya Sule : ‘मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय?’

by omkar

मुंबई: सरकारसत्ता ऑनलाइन –  महाराष्ट्रातील कामं, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही, हे वास्तव आहे. एक मात्र नक्की आहे कि, ‘महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीचं राजकारण आहे, असे सांगत सर्वच पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की, मुख्यमंत्री पद मिळाल पाहिजे. आणि यात गैर असं काही नसल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. एक दैनिकाला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपला महाविकास आघाडी सरकारवर टीका नक्की करा, पण वैयक्तिक टीका करू नये, असा सल्लाही दिला.

Video : ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’ – चंद्रकांत पाटील

सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून बारामती म्हणजे पवार कुटुंबीय आणि बारामती म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे हे समिकरण कायम आहे. वडील शरद पवार आणि आई यांनी मला दोनच गोष्टी सांगिलत्या आहेत आणि त्या मी नेहमी लक्षात ठेवते. ज्यावेळी मी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी शरद पवारांनी मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे संसदेमध्ये जाण्याची संधी बारामतीमुळे मिळाली आहे. ज्यावेळी तू या बारामतीकरांना विसरशील त्यावेळी तुला त्या दिवशी संसदेची ती पायरी चढता येणार नाही, असे म्हंटल होत आजही ती गोष्ट मी कायम ध्यानात ठेवते. पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादी पक्ष भविष्यात वाढावा हे वाटत आहे, फक्त पवार कुटुंबीय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाहीये, तर हा पक्षाच एक कुटुंब आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मी बारामतीतून निवडून आले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जात असल्यामुळे महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही’ असं सूचक वक्तव्यही केलं.

महाविकास आघाडीची स्थापना राज्याच्या स्थैर्यासाठी करावी लागली. यापूर्वी पुलोदचा प्रयोग झाला होता. भाजपला उत्तर प्रदेश, गुजरात सोडले तर सर्वत्र सत्ता मिळवताना कठीण झाले होते. तोडून फोडून मध्यप्रदेशमध्ये सरकार स्थापन केले. चाणक्य वगैरेंच्या ज्या गप्पा मारण्यात आल्या त्यांचा फुगा निवडणुकीनंतर फुटला होता अशी टीकाही सुळे यांनी केली. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आघाडी टिकेल की नाही अशी चर्चा सुरू होती ती आजही आहे पण याच महाविकास आघाडीच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. त्यामुळे टीका करा पण वैयक्तीक नको असे त्या म्हणाल्या.

Also Read:- 

पुणेकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा ! मिळकत कर योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली

मलाही प्रश्न पडलाय’, पवार-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले – ‘नेमकं चाललंय काय?’

तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र (Dance Video)

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ! शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी

‘राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या’ ! छत्रपती संभाजी राजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

वजन नक्की कमी होईल, फक्त सकाळी उठल्यानंतर ‘हे’ काम करा, जाणून घ्या

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, जाणून घ्या आजचे दर

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

Related Posts