IMPIMP

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात ‘वसुली’साठी ‘चंदननगर’च्या हवालदाराकडून रात्री उशिरा ‘तोडपाणी’ ! महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau Pune | महिलेची तक्रार न घेण्यासाठी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून 2
हजाराची लाच (Bribe) घेणार्‍या चंदननगर पोलिस ठाण्यातील (Chandan Nagar Police Station) पोलिस हवालदारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं
(Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ पकडलं आहे. तक्रार न घेण्यासाठी हवालदार चक्क लाचेची मागणी करीत असल्याचा प्रकार उघडकीस
आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अनिल निवृत्ती होळकर Anil Nivruti Holkar (52) असे लाच घेणार्‍या पोलिस हवालदाराचे नाव आहे. होळकर हे सध्या चंदननगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी एका महिलेला 50 हजार रूपये उसने दिले होते. ते त्यांना परत मिळवून देण्यासाठी व त्या महिलेची कोणतीही तक्रार न घेण्यासाठी पोलिस हवालदार होळकर यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 2 हजार रूपये लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पोलिस हवालदार होळकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष होळकर यांनी तक्रारदाराकडून 2 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक विजयमाला पवार (DySP Vijaymala Pawar) , पोलिस हवालदार अंकुश माने, अशफाक इनामदार, पोलिस अंमलदार शिल्पा तुपे, रियाज शेख, चालक दिपक दिवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Anti Corruption Bureau Pune | Anti Corruption Bureau Pune Arrested Police Havaldar Anil Nivruti Holkar of Chandan Nagar Police Station While Taking Bribe of 2000

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलीस भरतीत डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्‍या तरुणाला अटक; फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts