IMPIMP

Cooperative Society Elections | राज्यातील साडेचौदा हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार; पुण्यातील हजार संस्थांचा समावेश

by nagesh
Maharashtra Municipal Corporation-ZP Elections | 22 municipal corporation Zilla Parishad elections hold on after diwali Election commissions explanation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Cooperative Society Elections | राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दुसऱ्या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक (Cooperative Society Elections) प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आजपासून त्याची सुरुवात होणार असून यामध्ये प्रशासक आणि प्राधिकृत अधिकारी असणाऱ्या संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे या टप्प्यात राज्यातील 14 हजार 739 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा येत्या दोन महिन्यात उडणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी (Secretary of Co-operative Election Authority Yashwant Giri) म्हणाले, निवडणूक होणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या 12 हजार 332 इतकी आहे. तर प्रशासक अथवा प्राधिकृत अधिकारी कार्यरत असलेल्या 2 हजार 407 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक आराखडय़ातील टप्पा क्रमांक दोनमध्ये 31 डिसेंबर 2019 पर्यंत संचालक मंडळाची, नियुक्त प्रशासक अथवा प्राधिकृत अधिकाऱयांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांचा समावेश केलेला आहे. इतर टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया परस्पर सुरू करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूकी संदर्भात न्यायालयाचे विशिष्ट संस्थेबाबत आदेश असल्यास अशा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार नसल्याचे सहकार निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

 

पुण्यात एक हजार 65 संस्थांच्या निवडणुका
निवडणूक होणाऱ्या संस्थांमध्ये पुणे जिल्ह्यातील 990 सहकारी संस्थंचा समावेश आहे. त्यामध्ये ‘ब’ वर्गातील 51, ‘क’ वर्गातील 221, ‘ड’ वर्गातील 718 संस्था आहेत. तर प्रशासक, प्राधिकृत अधिकाऱयाची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांमध्ये ब वर्ग 32, क वर्ग 41 आणि ड वर्गातील 2 सहकारी संस्थांसह 75 संस्थांच्या निवडणुका होतील. म्हणजे जिल्ह्यातील दोन्ही मिळून 1 हजार 65 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :- Cooperative Society Elections | pune cooperative society elections second phase

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रेडाच्या ढुशीने तरुणाचा हात फॅक्चर, अवघड जागी खुपसले ‘शिंग’; रेड्याचा मालक ‘गोत्यात’

Mumbai High Court | कोवळ्या वयात मुलांना आईची गरज; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pune Crime | दिवसाढवळ्या शिवसेना तालुका उपप्रमुखाची पैशांची बॅग पळवली; परिसरात खळबळ

 

Related Posts