IMPIMP

Mumbai High Court | कोवळ्या वयात मुलांना आईची गरज; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

by nagesh
Mumbai High Court | 'Subodh Jaiswal should introspect himself and look at this as a possible accused'; Argument in the mumbai High Court by the maharashtra Government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai High Court | मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.  आईच्या ताब्यात मुलाला ठेवणे हे स्वाभाविक आहे.मुलाच्या कल्याणासाठी, विकासासाठी अनुकूल आहे. आईच्या सोबतीची कोवळ्या वयात मुलांना गरज असते. त्यामुळे तिला मुलाचा ताबा मिळणे स्वाभाविक असल्याचे न्यायालयाने (Mumbai High Court) म्हंटले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

एका टीव्ही अभिनेत्रींच्या पतीने मुलाचा ताबा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे
(Justice S. S. Shinde) व न्या. एन. जे. जमादार (Justice. N. J. Jemadar) यांच्या खंडपीठापुढे होती. मुल आईकडे राहिल्यास त्याचे कल्याण आणि विकास खुंटेल असे वाटत  नसल्याचे सांगत पतीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. आई – वडिलांच्या प्रेमाची आणि जिव्हाळ्याची मुलाला आवश्यकता असते.  त्यामुळे मुलाला वडिलांनाही भेटू द्यावे, असेही  न्यायालयाने स्पष्ट केले त्यासाठी दररोज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अर्धातास मुलाला आणि वडिलांना भेटून द्यावे. त्याशिवाय आठवड्यातून दोनदा वडिलांना मुलाला प्रत्यक्षात भेटण्यास  देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.  ‘याचिकाकर्ते (वडील) आणि प्रतिवादी क्रमांक (२) जी पडद्यावर पात्र साकारण्यात निपुण आहेत, हे दोघेही वास्तविक जीवनात मुलाच्या हितासाठीच काम करतील, अशी आम्हाला आशा व विश्वास आहे’, असे न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले.

 

याचिकाकर्त्यांची वकील स्वप्ना कोदे यांनी युक्तिवाद करताना अभिनेत्रीने बेकायदेशीररीत्या त्यांच्या मुलाला तिच्या एकटीच्या ताब्यात घेतले. ती खऱ्या आयुष्यातही मुलाची काळजी घेत असल्याचा अभिनय करत आहे. ती कामात व्यस्त असते. त्यामुळे मुलाच्या गरजेकडे ती लक्ष देऊ शकत नाही.  तर अभिनेत्रीतर्फे वकील हृषिकेश मुंदर्गी (adv hrishikesh mundargi) यांनी या याचिकेला विरोध केला. आईबरोबर मुलगा आनंदी असून वडिलांकडे मुलाचा ताबा दिला तर तो मुलाच्या विकासासाठी योग्य नसेल असा युक्तिवाद केला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय म्हणाले न्यायालय?

जोडप्याला एकमेकांप्रती वैरभावना वैवाहिक मतभेदामुळे आहे. पालक ज्यावेळी एकमेकांशी भांडतात त्यावेळी मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा याचा निश्चित मापदंड आहे. त्यानुसार एका पालकाच्या बांधिलकी वर व दुसऱ्या पालकाला वेळा उपलब्ध आहे म्हणून अल्पवयीन मुलाचे कल्याण ठरू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

Web Title : Mumbai High Court | children need mother early age decision mumbai high court

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दिवसाढवळ्या शिवसेना तालुका उपप्रमुखाची पैशांची बॅग पळवली; परिसरात खळबळ

Reality TV Show | ‘या’ ठिकाणी 21 रात्र नग्नावस्थेत जंगलात रहावं लागतं जोडप्याला, तुम्हाला माहितीय का विचित्र रिअ‍ॅलिटी शो?

Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’

 

Related Posts