IMPIMP

Dattatray Bharne | राज्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख

by nagesh
Dattatray Bharne | minister of state dattatraya bharane forgot the name of the chief minister uddhav thackeray and devendra fadnavis

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइनराज्य सरकारमधील राज्यमंत्री (Minister of State) दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांना मुख्यमंत्र्यांच्या (CM) नावाचा विसर पडला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणण्या ऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असा उल्लेख केला. यानंतर व्यासपीठावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत असे सांगितले. ते इंदापूर (Indapur) येथील एका कार्यक्रमात बोलत होते. भरणे यांनी चुकीचा उल्लेख केल्यामुळे उपस्थितांनी पहाटेचा शपथविधी अजूनही लक्षात आहे का ? असा टोला लगावला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इंदापूर येथील एका खासगी कार्यक्रमात सोमवारी (दि.15) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जे घटक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) असतील या वाक्यावर व्यासपीठावर उपस्थितांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत अशी आठवण त्यांना करुन दिली. यानंतर भरणे यांनी होय का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असे विचारले.

 

यावेळी उपस्थितांनी अजूनही पहाटेचा शपथविधी लक्षात आहे का ? असा शेरा मारला.
यानंतर सारवासारव करत भरणे यांनी सतत डोक्यात खूप विचार असल्याने असे होते.
त्याला काय करता. या कार्यक्रमानंतर भरणे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Web Title :- Dattatray Bharne | minister of state dattatraya bharane forgot the name of the chief minister uddhav thackeray and devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, सोनं पुन्हा 50 हजारांवर, जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग

Weight Control | ‘बेली फॅट’ कमी करायचे असेल तर ‘या’ 5 ‘सुपरफूड’चा करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

 

Related Posts