IMPIMP

Gold Price Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, सोनं पुन्हा 50 हजारांवर, जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Sovereign Gold Bond | sovereign gold bonds latest news last day to buy gold at discount details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनआज सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price Today) कमालीची वाढ झाली आहे. सोन्याचा दर 1910 रुपयांनी वधारला असून सोने प्रति 10 ग्रॅम 51,410 रुपये झाले आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price) 323 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदी दर 64,556 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) वर सोन्याचे फ्युचर्स 0.57 टक्क्यांनी (Gold Price Today) किंवा 286 रुपयांनी वाढून 50,202 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. चांदीचा भाव 0.50 टक्क्यांनी किंवा 323 रुपये वाढून प्रति किलो 64,556 झाला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा भाव
स्पॉट सोन्याचा भाव (Spot Gold Price) 0.1 टक्क्यांनी वाढून 1,871.52 डॉलर औंस झाला आहे. गेल्या सत्रात, सराफा किमतींनी 16 नोव्हेंबरपासून 1,873.91 ची सर्वोच्च पातळी गाठली होती. यूएस सोन्याचे फ्युचर्स (US Gold Futures) 0.2 टक्क्यांनी वाढून 1,873.40 वर पोहोचले. इतर मौल्यवान धातूंपैकी स्पॉट सिल्व्हर (Spot Silver) 0.2 टक्क्यांनी वाढून 23.87 प्रति औंस, तर प्लॅटिनम (Platinum) 0.2 टक्क्यांनी वाढून 1,030.11 वर पोहोचला. पॅलेडियम 0.3 टक्क्यांनी वाढून 2,368.33 वर पोहोचला आणि सोमवारी जवळपास दोन आठवड्यांनी सर्वोच्च पातळी गाठली.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर
सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gold Price Today | gold price today gold rate increases today gold price move higher

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग

Weight Control | ‘बेली फॅट’ कमी करायचे असेल तर ‘या’ 5 ‘सुपरफूड’चा करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

Pune Crime | व्हिसासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन 1 कोटींचे काढले कर्ज, स्टेट बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

 

Related Posts