IMPIMP

Jayant Patil | तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले- जयंत पाटील

by nagesh
Jayant Patil | The Shinde government has completely failed to fulfill the expectations of the youth

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला (Shinde Government) पूर्णपणे अपयश आले असून लवकरात लवकर या सर्व भरत्या घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. महाराष्ट्रातील पोलीस भरती (Police Recruitment) रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) वतीने जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री रोड येथे निषेध आंदोलन (Agitation) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला असून, कुठलाही नवीन प्रकल्प त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये इच्छाशक्ती नसताना राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात आलेले प्रकल्प देखील यांना टिकवता आलेले नाही. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या अडचणीत सापडल्या असून त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती देखील या सरकारने स्थगित करून तरुणांच्या शासकीय नोकऱ्यांचा मार्ग देखील बिकट केला आहे. राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले असून लवकरात लवकर या सर्व भरत्या घेण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने आम्ही घेत आहोत.

 

सरकारने महाराष्ट्रातील युवक बेरोजगार केला

पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde – Fadnavis Government) महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. राज्यात युवकांचे भवितव्य अधिक गडद होत असल्या बाबत पालकांच्या पोटाला पीळ पडला आहे. अनेक मोठमोठे उद्योग बाहेर पाठवले गेले, पोलीस भारतीचा बनाव करून युवक निराश झाला आहे. महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे याची खंत वाटते. महाराष्टाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात अनेक लोकांहिताचे प्रश्न आ वासून उभे आहेत. युवक बेरोजगारीने हंबरडा फोडत आहेत. आजपर्यंत आपला पोशिंदा राजा बळीराजा पूर्ण पणे कोलमडला आहे. लाखो आत्महत्या पहायला मिळत आहेत. या महाराष्ट्रातला युवक वर्ग बेरोजगारीने पिचला जात असून त्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण सरकार कडे नाही. हे चित्र बदलण्यात शिंदे सरकार कडे ठोस कुठलेही धोरण नाही, असे मत प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादी युवक च्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये “शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी करतात गुजराती चाकरी”, “द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी”, “पन्नास खोके महाराष्ट्राला धोके” भरती रद्द , महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला.. महाराष्ट्रातील तरुणांनी करायचे तरी काय ….? दहीहंडी , नवरात्री , गरबा दुसरं काय..? अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

 

या आंदोलन प्रसंगी शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh), किशोर कांबळे,
मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, श्रीहरी दबडे, बापू डाकले, संगीता बराटे, गिरीष गुरुनानी, आनंद सागरे,
गजानन लोंढे, कुलदीप शर्मा, योगेश सुतार, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Web Title :- Jayant Patil | The Shinde government has completely failed to fulfill the expectations of the youth

 

हे देखील वाचा :

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या

Pune Crime | धक्कादायक! शिवीगाळ केल्याने 11 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, मायलेकींवर FIR

Parambir Singh | परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील 2 निलंबित पोलिस अधिकारी पुन्हा राज्य पोलिस दलाच्या सेवेत, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts