IMPIMP

NCB Officer Sameer Wankhede | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचा खुलासा, म्हणाले – ‘माझे वडील हिंदू, तर आई…’

by nagesh
sameer-wankhede-sameer-wankhede-family-to-file-complaint-against-ncp-minister-nawab-malik-in-aurangabad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drug Case) एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) हे चांगलेच वादात सापडल्याचे पहायला मिळत आहे. एनसीबीच्या पंचाने समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला (Birth certificate) ट्विट केला असून ‘समीर दाऊद वानखेडे इथपासून हा फर्जीवाड़ा सुरु’ झाल्याचे म्हटलं. त्यानंतर आता समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांनी तात्काळ खुलासा केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

नवाब मलिकांच्या आरोपांवर खुलासा करताना समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) म्हणाले, नवाब मलिक हे माझ्या खासगी गोष्टी
जाहीरपणे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मलिक माझ्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे
(Dnyandev Kacharuji Wankhede) हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) निवृत्त अधिकारी असून ते हिंदू
(Hindu)आहेत. तर आई झाहिदा ही मुस्लिम (Muslim) आहे. मी हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही धर्मासोबत संबंधित असून मी स्वतंत्र विचाराचा आहे, असा
खुलासा त्यांनी केला आहे.

 

 मलिकांचा लग्नाचा दावा खरा

समीर वानखेडे यांचे यापूर्वी लग्न झाले असून त्यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर देखील वानखेडे यांनी खुलासा केला आहे. माझं पहिलं लग्न डॉ. शबाना कुरेशी (Dr. Shabana Qureshi) यांच्यासोबत 2006 मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत झालं होतं. त्यानंतर 2017 मध्ये मी तिच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर क्रांती रेडेकरसोबत (Kranti Redekar) विवाह केला, अशी माहिती वानखेडे यांनी पत्रातून दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मलिकांना नोटीस देणार

नवाब मलिक यांनी ‘समीर दाऊद वानखेडे यहां से शुरू हुआ फर्जीवाडा’ असं ट्विट करत वानखेडे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली असून त्यांना मानसिक त्रास झाला आहे. त्यासाठी मंत्री नवाब मलिक यांना नोटीस (Notice) बजावणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

 

Web Title: NCB Officer Sameer Wankhede | Sameer Wankhede’s revelation after the allegation of NCP Minister Nawab Malik, said – ‘My father is a Hindu, but my mother

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून भरदिवसा खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Crime News | खळबळजनक ! चक्क 12 वर्षांच्या मुलीने थेट पोलीस अधिकारी पित्याचीच केली हत्या

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्र सरकारवर आरोप करतील’

 

Related Posts