IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शरद पवारांचा टोला

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | NCP Chief Sharad Pawar On Chandrakant Patil Statement Of CM Eknath Shinde

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन आधीच झेड सुरक्षाव्यवस्था (Z Security) असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने अधिक सुरक्षा होती. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आज (शनिवार) व्यक्त केले. सरकार असेच चालवायचे आहे, की सबंध सत्ता केंद्रित ठेवून दोघांनी चालवायचे ही भूमिका घेतलेली दिसते. त्याला राज्यातल्या आणि केंद्रातल्या सहकाऱ्यांची संमती दिसते, असेही शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

 

शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्याबद्दलची वस्तुस्थिती मला माहिती नाही. सुरक्षा कोणाला कशी आणि किती द्यायची हे कॅबिनेट आखत नाही. याबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. याबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव (Chief Secretary), गृह सचिव (Home Secretary) या वरिष्ठ लोकांची कमिटी असते. आज मी सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Former HM Dilip Walse Patil) यांना भेटलो. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. तसेच त्यांच्याकडे गडचिरोलीचा पदभार असल्याने अतिरिक्त फोर्स त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे मला असं वाटतं याबद्दल अधिक चर्चा करण्याची गरज नाही, असंही पवार म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यांनी दगड मनावर ठेवावा की…
राज्यातील सत्ताबदलासाठी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री (CM) करावे लागले,
या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांच्या विधानासंदर्भात विचारले असता,
त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
त्याविषयी मला काही बोलायचे नाही, अशा शब्दात शरद पवारांनी टोला लगावला.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | NCP Chief Sharad Pawar On Chandrakant Patil Statement Of CM Eknath Shinde

 

हे देखील वाचा :

High Cholesterol झाल्यास शरीराराचा ‘हा’ भाग देतो 4 Warning Sign, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Side Effects Of Turmeric | प्रमाणापेक्षा जास्त करू नका हळदीचे सेवन, ‘या’ आजारांना मिळेल निमंत्रण

Pune Crime | खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातून चंदनचोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Related Posts