IMPIMP

Police Suicide | पुण्यातील एसआरपीएफच्या पोलीस जवानाने एसएलआरतून गोळी झाडून केली आत्महत्या; प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Police Suicide | पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF, Pune) च्या जवानाने आपल्याकडील एसएलआर रायफलने स्वत:च्या मानेखाली गोळी मारुन आत्महत्या (Suicide) केली. पुष्कर शिंदे Pushkar Shinde (वय ३६, रा. पुणे) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. (Police Suicide)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पुष्कर शिंदे हे एसआरपीएफ गट क्रमांक २ च्या प्लाटून नं. १ मध्ये कार्यरत होते. मंत्रालय मेन गेट येथे बंदोबस्तासाठी असलेल्या स्ट्रायकिंग क्रमांक ३ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिंदे हे मुळचे रत्नागिरीचे असून सध्या पुण्यात वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी शिंदे हे सुट्टीवरुन कामावर हजर झाले होते.  सोमवारी रात्रपाळी केल्यानंतर मंगळवारी सकाळी प्लाटून डोंगरी येथील पालिका शाळेत विश्रांतीला आली होती. शिंदे हे सकाळी ८ ते १० यावेळेत गाडीवर गार्डसाठी तैनात होते. सकाळी पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान बसमध्ये चढण्यासाठी असलेल्या पायर्‍यांवरच शिंदे यांनी आपल्याकडील एसएलआर रायफलमधून मानेखाली गोळी मारुन घेतली (Police Suicide). अचानक झालेल्या गोळीच्या आवाजाने त्यांचे सहकारी धावत बसजवळ आले. तेव्हा शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी शिंदे यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात नेले. परंतु, तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शिंदे यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

 

 

Web Title :  Police Suicide | SRPF Pune Police Pushkar Shinde Suicide

 

हे देखील वाचा :

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या

Pune Crime | अप्पर इंदिरानगरमध्ये टोळक्यांचा पुन्हा धुडगुस ! 3 टेम्पो, 2 रिक्षा, कार, दुचाकीच्या काचा फोडून माजविली दहशत

Vodafone-Idea | वापरकर्त्यांसाठी महत्वाची माहिती ! Recharge प्लान महाग होणार; जाणून घ्या

 

Related Posts