IMPIMP

Vodafone-Idea | वापरकर्त्यांसाठी महत्वाची माहिती ! Recharge प्लान महाग होणार; जाणून घ्या

by nagesh
Vodafone-Idea | vodafone idea users may see a tariff hike

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Vodafone-Idea | भारतातील दुरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपनीकडून एक महत्वाची आणि वाईट माहिती समोर आली आहे. व्होडाफोन-आयडिया हि कंपनी सध्या तोट्यात चालताना दिसत आहे. रिलाईन्स आणि जीओचा फटका या कंपन्यावर पडलेला दिसत आहे. दरम्यान, व्होडाफोन-आयडिया या कंपनीकडून आणखी एकदा आपल्या प्लान्सचे दर वाढवण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी पुन्हा किंमती सुधारित केले जाऊ शकतात. मात्र, ते मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये केलेल्या टॅरिफ हाईक आणि मार्केट रिऍक्शनवर अवलंबून असणार असल्याचं कंपनीच्या एका उच्च-स्तरीय अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”कंपनीने सुमारे एक महिन्याची सेवा वैधता देणार्‍या सर्वात स्वस्त प्लानची किंमत ९९ रुपये निश्चित केली आहे. जी, 4G सेवा वापरणाऱ्या युजर्सनुसार फार महाग नाही. तर, यावर्षी पुन्हा एकदा प्लान्स महाग होऊ शकतात.” अशी माहिती व्होडाफोन-आयडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंदर टक्कर (Ravinder Takkar) यांनी दिली आहे. (Vodafone-Idea)

 

 

व्होडाफोन-आयडिया (Vodafone- Idea) (Vi) ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत एअरटेल आणि जिओच्या (Airtel and Jio) मागे आहे. प्लान्स महाग झाल्यानंतर एका वर्षात व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक संख्या 26.98 कोटींवरून 24.72 कोटींवर आलीय. दर महाग असूनही, कंपनीचा ARPU अर्थात प्रति वापरकर्ता सरासरी महसूल 5 टक्क्यांनी खाली येऊन 115 रुपयांवर आलाय, जो 2020-21 च्या याच तिमाहीत 121 रुपये होता.

 

 

दरम्यान, प्रचंड तोटा करणाऱ्या Vodafone- Idea च्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. मागील आठवड्यात,
कंपनीने अहवाल दिला की, डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण तोटा वाढून 7,230,9 कोटी रुपये झालाय,
जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 4,532,1रुपये इतका कोटी होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Vodafone-Idea | vodafone idea users may see a tariff hike

 

हे देखील वाचा :

Bank Rules Change | SBI, PNB, BoB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 1 फेब्रुवारीपासून बदलतील ‘हे’ नियम, तात्काळ जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात ‘बर्थ-डे’ पार्टीला बोलावून केला 32 वर्षाच्या इंजिनिअर तरुणीवर बलात्कार

Brain Stroke | तुम्ही सुद्धा आंघोळ करताना ‘ही’ मोठी चूक करता का? ब्रेन स्ट्रोकला पडू शकता बळी

 

Related Posts