IMPIMP

Pune Ambegaon Crime | पुणे : संतापजनक! रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Ambegaon Crime | मागील अनेक दिवसांपासून शाळा व क्लासला जाताना रोडरोमीयोंनी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तसेच तिचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral On Social Media) करण्याची धमकी दिली. रोडमियोंच्या सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt To Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. ही घटना आंबेगाव येथे 13 मार्च 2024 रोजी घडली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 50 वर्षीय वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapeeth Police Station) ठाण्यात मंगळवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. यावरुन अजिंक्य आवटे (रा. भोसरी) व सुजल खुणे (रा. आंबेगाव पठार) यांच्यावर आयपीसी 354(ड), 506, 34 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Molestation Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 17 वर्षाच्या मुलीला आरोपी जानेवारी 2024 पासून त्रास देत आहेत. मुलगी शाळा व क्लासकरीता जात-येत असताना आरोपींनी तिच्याशी सतत सोशल मीडिया व प्रत्यक्ष पाठलाग करुन त्रास दिला. तिच्या नकळत तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी तणावात होती. 13 मार्च रोजी मुलीने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे (PSI Sonali Mithare) करीत आहेत.

Punit Balan Group | ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धे’त ‘पुनीत बालन ग्रुप’च्या आरती पाटीलला 2 कांस्य पदके

Related Posts