IMPIMP

Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

by nagesh
Pune Congress | Celebrating Sonia Gandhi's birthday by cutting cake with elders

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Congress | काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या (Congress OBC Cell) पुणे शहर (Pune Congress) उपाध्यक्ष अ‍ॅड. मोनिका खलाने (Adv. Monica Khalane) यांनी पुण्यातील ‘मातोश्री वृद्धाश्रम’ (Matoshree Vruddhashram) येथे सर्व वृद्ध आजी आजोबांसोबत केक कापून साजरा केला. यावेळी आजी- आजोबांना अल्पोपहार देण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना खलाने म्हणाल्या, गांधी कुटुंबीयांनी देशाची सेवा स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन केली आहे. सोनिया गांधी यांच्या त्यागाची भूमिका ही खूपच मोठी गोष्ट आहे, त्यामुळे आज सोनिया गांधी यांचा वाढदिवस हा वृद्ध आजी आजोबांसोबत साजरा करण्याचा माझा मानस होता. सिंहगड रोड येथील ‘मातोश्री वृद्धाश्रम’ येथे सर्व आजी आजोबांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.

 

 

यावेळी या सर्व आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोठा होता.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीने सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा केला.
त्यामुळे या सर्व आजी आजोबांचे आशीर्वाद सोनिया गांधी यांना मिळणार आहेत.
माझ्याकडून देखील सोनिया गांधी यांना दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते,
असे मनोगत खलाने यांनी व्यक्त केले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Congress | Celebrating Sonia Gandhi’s birthday by cutting cake with elders

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

Pune Crime | पुण्यातील हिंगणे परिसरातील निरज ढवळे व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 113 वी कारवाई

 

Related Posts