IMPIMP

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील कचरा व्यवस्थापन पालिकेपुढील ‘आव्हान’; ‘पर्याय’ सुचविण्याचे ‘आवाहन’

by nagesh
Pune PMC Election 2022 | After reservation changes in as many as 25 wards 'Kahi Khushi Kahi Gum...'

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावातील कचऱ्याचे व्यवस्थापन महापालिकेसाठी (Pune Corporation) आव्हान ठरत आहे. या गावांतून दररोज जमा होणाऱ्या सुमारे 200 टन कचऱ्याचे काय करायचे ? या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कचरा व्यवस्थापनाशी संबंधित कंपन्या अथवा ठेकेदारांनी ‘पर्याय’ सुचवा याची निविदाच प्रशासनाने (Pune Corporation) काढली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे महापालिकेत (Pune Corporation) 30 जून रोजी 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांतील रस्ते, पाणी, सांडपाणी, सार्वजनिक वीज व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत व्यवस्थांची जबाबदारी महापालिकेकडे आली आहे. शहरालगतच असल्याने या गावांमध्ये लोकसंख्या मोठी आहे. साधारण 2 लाख मिळकती असून दररोज 200 टन कचरा निर्माण होतो. पूर्वी या कचऱ्याचे व्यवस्थापण ग्रामपंचायतींमार्फत होत होते. मात्र, 30 जून नंतर ग्रामपंचायती विसर्जित झाल्याने जबाबदारी पालिकेकडे आली आहे.

 

पालिकेच्या जुन्या हद्दीतील कचरा व्यवस्थापन अद्याप पूर्ण क्षमतेने होत नाही. पालिकेचे एखाद दुसरा प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प पूर्ण क्षमतेने होत नसल्याने व काही प्रकल्प अर्धवट असल्याने सुमारे 300 टन कचरा रामटेकडी येथील बंद पडलेल्या दिशा प्रकल्पाच्या शेड मध्ये साठवण्यात येत आहे. या शेड मध्येही एक लाखांहून अधिक कचरा साठला असून आता त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भलीमोठी टिपिंग फी देण्यात येत आहे.

 

या पार्श्वभूमीवर वाढलेल्या कचऱ्याचे करायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पालिकेने
23 गावातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ‘पर्याय’ जाणून घेण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट
मागविले आहेत. यामध्ये कचरा थेट सिमेंट फॅक्टरी मध्ये वाहून नेणे, ओला कचरा शेतीसाठी पुरवणे , प्रक्रिया करणे आदी उपाय सुचवावेत असे आवाहन पालिकेने केले आहे.

 

Web Title : Pune Corporation | big challenges in front of PMC regarding 23 villages

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कर्वेनगरमधील सराईत गुंडाला केले तडीपार

Pune Crime | पुण्यात कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीचा डॉक्टर पत्नीवर चाकू हल्ला; विश्रांतवाडी परिसरात खळबळ

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mahavikas Aghadi | …तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही; काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा

 

Related Posts