IMPIMP

Pune Court | गुन्हा दाखल करण्याच्या ‘त्या’ आदेशाला सत्र न्यायालयाची स्थगिती; उस्मान तांबोळी म्हणाले – ‘ रौनक ओसवाल यांच्यावर 5 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करणार’

by nagesh
Kolhapur Crime | cousin raped by breaking into the house in broad daylight 30 year old nephew sentenced to 10 years kolhapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Court | अगोदरच ८४ लाख रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल असताना चुकीची माहिती सादर करून त्याव्दारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडून (Pune Court ) गुन्हा दाखल करण्याच्या आदेश मिळवला. पण आता ‘त्या’ आदेशाला सत्र न्यायालयाने (Sessions Court) स्थगिती दिली आहे. दरम्यान, पोर्शे कार देण्याच्या बहाणा करुन फसवणूक केल्याच्या प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी रौनक ओसवाल यांच्याविरुद्ध 5 कोटी रूपयांचा आब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे उस्मान तांबोळी यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत उस्मान तांबोळी यांनी सांगितले की, व्यवसायासाठी घेतलेले ८४ लाख रुपये परत न करता
फसवणूक केल्याप्रकरणी आपण समर्थ पोलीस ठाण्यात रौनक दिलीप ओसवाल व
संगीता दिलीप ओसवाल यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती.
समर्थ पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांनी मर्सिडीज गाडी देण्याच्या बहाण्याने १० लाख रुपये घेऊन गाडी दिली नाही.
या गुन्ह्यात तपास सुरू असून त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ओसवाल यांनी न्यायालयात तक्रार करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश घेतला आहे.
एका गुन्हयात जप्त केलेली महागडी कार कमी किंमतीत मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून ४३ लाख रुपये उकळल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रसारित झाली होती. वास्तविक या प्रकरणांशी आमचा काहीही संबंध नाही.
याबाबत आम्ही सत्र न्यायालयात सर्व वस्तूस्थिती स्पष्ट केल्यानंतर अतिरक्त सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करायला स्थगिती दिली आहे.
असे असताना काही प्रसार माध्यमांमध्ये बातमी देऊन बदनामी केल्याबद्दल रौनक ओसवाल यांच्यावर ५ कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे उस्मान तांबोळी यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Court | Sessions Court’s stay on ‘that’ order to file charges; Usman Tamboli says – ‘Raunak will file defamation suit against Oswal for Rs 5 crore

 

हे देखील वाचा :

Crime News | खासगी रुग्णालयात कंपाऊंडरनेच केला महिला रुग्णावर अत्याचाराचा प्रयत्न

Coronavirus in india | देशात गेल्या 24 तासात 33 हजार 376 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Maha Vikas Aghadi | शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसचं सरकार कसं बनलं : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

 

Related Posts