IMPIMP

Pune Court | ‘या’ प्रकरणात गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

by nagesh
Pune Crime | Bail granted to accused in Pita case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Court | तळोजा कारागृहातून (taloja jail) बाहेर पडल्यानंतर वाहनांच्या ताफ्यासह तळोजा ते पुणे अशी रॅली काढून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे तसेच सरकारी कार्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कुख्यात गुंड गजानन मारणे (gangster gaja marne) याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हा (Pune Court) निकाल दिला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुणे बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर (pune bangalore highway) चांदणी चौकात (chandani chowk pune) 15 फेब्रुवारी रोजी रात्री हा प्रकार घडला.
याबाबत गजानन मारणेसह (gangster gajanan marne) त्याच्या साथीदाराविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune Police) आहे.
मिरवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात (hinjewadi police station) देखील गुन्हा दाखल आहे.
त्या गुन्ह्यात देखील मारणे याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. कोव्हिड 19 च्या पार्श्वभुमीवर जमाव जमविल्याने परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा करणा-‍या पोलीस अधिका-‍यास आरोपी संतोष शेलारने (Santosh Shelar) मोटारीच्या खिडकीतून हात बाहेर काढून ढकलले तसेच नाही असे बोलून त्यांना न जुमानता कोथरूडच्या दिशेने (Kothrud) निघून गेले.
कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता, सुरक्षित अंतर ठेवले नाही असे फिर्यादीत नमूद आहे.

गजानन मारणे याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.
त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया (Additional Public Prosecutor Rajesh Kavedia) विरोध केला.
तसेच गजानन मारणे हा टोळी चालवितो तो आणि त्याच्या साथीदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, अपहरण, दंगा करणे,
बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभिर दुखापत करणे, बेकायदेशीर मालमत्ता बळकाविणे, जाळपोळ, आदी गुन्हे दाखल आहेत. तसेच मोक्का कायद्यान्वयेही गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, आरोपीने काढलेल्या रॅलीची चित्रफित समाजमाध्यमावर पसरली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आरोपींनी दहशत निर्माण करीत सरकारी कर्मचा-‍यास ढकलून दिले आहे. तसेच कारचे सनरूफ उघडे ठेवून स्वत:ला बाहेर प्रदर्शित करून दहशत माजवित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
आरोपीने कोणत्या हेतुने रॅली काढली? तसेच सुमारे 500 वाहनांसह शक्तीप्रदर्शन केले आहे.
रॅलीचे आयोजन कोणी केले आणि यासाठी कोणी आर्थिक पुरवठा केला याचा शोध घ्यायचा असल्याचे कावेडिया यांनी युक्तीवादा दरम्यान सांगितले.

 

Web Title : Pune Court | The court rejected the bail application of gangster gajanan marne

 

हे देखील वाचा :

Pune Court | गारवा हॉटेलच्या मालकाच्या खून प्रकरणात महिला आरोपीस जामीन

Income Tax Department | देशातील कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा ! प्रलंबित कर प्रकरणे निकाली काढण्याची अंतिम मुदत वाढवली, जाणून घ्या नवीन तारीख

Gold Price Today | वाढीनंतर सुद्धा सोने 45 हजार रुपयांच्या जवळ, चांदी झाली महाग; जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts