IMPIMP

Pune Crime | निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर 1.20 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

by nagesh
Sangli Crime | dubai based company cheated with sangli grapes pomegranate businessman case registered

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune Crime | अस्तित्वात नसलेल्या जमिनीच्या गहाणखताद्वारे सारस अर्बन को-ऑ क्रेडिट सोसायटीतून 1 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज घेवुन त्याचे हप्ते न भरता फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबासह 6 जणांवर वारजे पोलिसांनी (warje malwadi police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सचिन दत्तात्रय टेमघरे (वय 40), अमोल दत्तात्रय टेमघरे (वय 39), मनोज दत्तात्रय टेमघरे, मंगला दत्तात्रय टेमघरे (सर्व रा. इंद्रधनु सोसायटी, कोथरुड), भगवान विठोबा बराटे (रा. कृष्णकुुंज), गणेश भागोजी कराळे (वय 54) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सारस अर्बन को ऑ क्रेडिट सोसायटीचे (saras urban co-operative credit society) वसुली अधिकारी नितीन जोरकर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 13 एप्रिल 2014 पासून सुरु झाली आहे. सचिन, अमोल, मनोज आणि मंगला टेमघरे यांनी सारस अर्बनकडे वारजे गट क्र 73 हिस्सा नं. 1 क्षेत्र 950 चौमी ही स्वत:चे मालकीची जमीन गहाण खताद्वारे संस्थेला लिहून दिली.

त्यावर संस्थेकडून 1 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज काढले. सुरुवातीला कर्जाचे हप्ते भरले. नंतर हप्ते भरणे बंद केल्यामुळे फिर्यादी यांनी या मिळकतीवर कारवाई सुरु केली असता ही मिळकत अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. सखोली चौकशी केली असताना चारही आरोपींनी इतर दोघा आरोपींशी संगनमत करुन खोटा व बनावट दस्त तयार करुन तो खरा असल्याचे भासवून संस्थेची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेकडून अगोदर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud
Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी न्यायालयाने कारवाई करण्यास
स्थगिती दिली होती. ही हद्द वारजे पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station)
हद्दीत येत असल्याने हा गुन्हा वारजे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाची
स्थगिती उठविल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Pune Crime | 1.20 crore fraud case filed against retired police inspector’s family

 

हे देखील वाचा :

Pune Police Inspector Transfer | पुण्यात 3 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Narayan Rane | ‘या’ अटीखाली नारायण राणे यांना मिळाला जामीन, जाणून घ्या

Pune Police Inspector Transfer | वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची अखेर बदली

 

Related Posts