IMPIMP

Pune Crime | प्रियकराने विवाहास नकार दिल्याने 24 वर्षीय गर्भवती तरूणीची आत्महत्या; दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Youth commits suicide due to harassment by wife and in-laws; Wife grabbed the house, place through fake documents

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | प्रियकराने विवाहास नकार दिल्यानंतर गर्भवती असलेल्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या नातेवाईकांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

आत्महत्या केलेली तरूणी पर्वती पायथा (Parvati Paytha) येथील जनता वसाहतीमध्ये (Janta Vasahat) रहावयास होती. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकर संग्राम उर्फ पिटया विलास पानसरे, त्याची आई, मावशी आणि एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात 24 वर्षीय तरूणीच्या आईने दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. तरूणीचे संग्रामसोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबियांना त्यांच्यामधील प्रेमसंबंधाबाबत कल्पना होती. दोघे विवाह करणार होते. दरम्यान, तरूणी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपी प्रियकर संग्रामने तिच्यावर संशय घेतला आणि तिचा छळ सुरू केला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संग्रामने तरूणीशी विवाहास नकार दिला. पाच दिवसांपुर्वी तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर तरूणीच्या आईने दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी तरूणीचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संग्राम आणि
त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | 24-year-old pregnant woman commits suicide after boyfriend refuses marriage; Crime in Dattawadi Police Station

 

हे देखील वाचा :

Winter Session 2022 | मुंबई महापालिकेच्या रूग्णालय घोटाळ्यात अडकणार ठाकरे परिवारातील जवळचा व्यक्ती?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश…

Ajit Pawar | अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘या प्रकरणचं सत्य…’

MP Supriya Sule | अनिल देशमुखांच्या सुटकेवरुन सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका, म्हणाल्या- ‘ईडीने 109 वेळा छापे टाकले, हा तर जागतिक विक्रम’ (व्हिडिओ)

 

Related Posts