IMPIMP

MP Supriya Sule | अनिल देशमुखांच्या सुटकेवरुन सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका, म्हणाल्या- ‘ईडीने 109 वेळा छापे टाकले, हा तर जागतिक विक्रम’ (व्हिडिओ)

by nagesh
MP Supriya Sule | supriya sule criticized shinde fadnavis government after sanjay shirsat statement on sushma andhare

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आज तुरुंगातून (Jail) बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना 27 दिवसांनी अनिल देशमुख यांची सुटका होणार आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे नेते मुंबईत पोहचले आहेत. अनिल देशमुख यांच्या सुटकेवरुन खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे. 109 वेळा त्यांच्या घरावर छापे टाकले, खरं तर हा जागतिक विक्रमच म्हणावा लागेल अशी टीका सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
केंद्र सरकार आणि राज्यातील ‘ईडी’ सरकार विरोधात जो कोणी बोलतो, त्याला केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली जाते. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले जाते. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), संजय राऊत (Sanjay Raut), नवाब मलीक (Nawab Malik) अशी अनेक प्रकरणं गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. अनिल देशमुखांना एक-दीड वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आले. या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांची मनस्थिती काय होती? हे मी जवळून पाहिले आहे. त्याला जबाबदार कोण आहे? असा सवाल सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी विचारला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अनिल देशमुख यांना जामीन देताना त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
109 वेळा त्यांच्या घरावर छापे टाकूनही ईडीला (ED) काहीच मिळाले नाही.
खरं तर हा जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. अशा प्रकारे 109 वेळा कोणाच्याही कुटुंबावर छापे पडले नसतील.
त्यांच्या संबंधित लोकांच्या घरावरही छापे टाकले, तिथेही काहीच मिळाले नाही.
परंतु बदला घेण्याच्या हेतूने जो प्रकार केंद्र सरकारने केला तो दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Web Title :- MP Supriya Sule | supriya sule criticized modi government anil deshmukh bail in money laundering case

 

हे देखील वाचा :

Bhaskar Jadhav | आमदार नितीन देशमुख यांच्यावर मुद्दाम गुन्हा दाखल केला – भास्कर जाधव

Anil Deshmukh | अखेर अनिल देशमुख 1 वर्ष, 1 महिना आणि 27 दिवसांनी तुरुंगाबाहेर, ढोल ताशाचा गजर, फुलांची उधळण; कार्यकर्त्यांचा जल्लोष

Phone Tapping Case | मला आजही भीती वाटते कुणाशी कसं…; फोन टॅपिंग प्रकरणावर एकनाथ खडसेंचे सभागृहात विधान

 

Related Posts