IMPIMP

Pune Crime | पुण्यातील वकिलाला जीवे मारण्याची धमकी; केली 5 लाखाच्या खंडणीची ‘डिमांड’

by nagesh
Pune Crime | 5 lakh extortion was demanded by threatening to kill the lawyer who obtained maintenance from the family court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | कौटुंबिक न्यायालयातून (Family Court, Pune) खर्चाकरिता दरमहा मेंटनन्स मिळवून दिल्याच्या रागातून पतीने साथीदारांच्या मदतीने वकिलाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat To Pune Lawyer) देऊन त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी वडगाव शेरी (Vadgaon Sherry, Pune) येथील ४७ वर्षाच्या वकिलांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station)
फिर्याद (गु. रजि. नं. ८२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रॉबिन अशोककुमार जैन (Robin Ashok Kumar Jain),
अशोककुमार जैन (Ashok Kumar Jain), चंद्रा अशोककुमार जैन Chandra Ashok Kumar Jain (सर्व रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, बावधन),
मनोज एस बिडकर Manoj S Bidkar (रा. शनिवार पेठ) व त्यांचे इतर २ साथीदार अशा सहा जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २०१८ ते १२ व २३ जानेवारी २०२२ आणि २५ मार्च २०२२ दरम्यान जहांगीर चौक परिसरात घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकिली व्यवसाय करतात.
त्यांनी रॉबिन जैन यांच्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयातून खर्चाकरीता दरमहा मेंटनन्स मिळवून दिला होता.
या कारणावरुन चिडुन जाऊन जैन कुटुंब व मनोज बिडकर यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने जहांगीर हॉस्पिटल (Jehangir Hospital) जवळील चौकात फिर्यादी यांना अडविले.
त्यांना हाताने मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
तुझ्यामुळे आम्हाला खर्च करावा लागतो आहे, असे म्हणून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
तुम्ही कधी सुधारणार नाही असे बोलून ५ लाख रुपये खंडणीची (Ransom Case) मागणी केली.
सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
परंतु, हा प्रकार वारंवार घडल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी खंडणी तसेच अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सावंत (PSI Sawant) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 5 lakh extortion was demanded by threatening to kill the lawyer who obtained maintenance from the family court

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts