IMPIMP

Pune Crime | गुंडांच्या टोळक्याने युवकावर कोयत्याने वार करुन घरावर केली दगडफेक, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Mundhwa: It is expensive to settle disputes; The young man was beaten and seriously injured

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime | भांडणे करणार्‍या टोळक्याला घरासमोर भांडणे करु नका, असे म्हटल्याच्या रागातून गुंडांच्या टोळक्याने युवकावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आजीच्या गळ्याला कोयता लावून घरावर दगडफेक करण्यात आली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी अनिकेत दिलीप मोडक (वय १९, रा. वडकी, हवेली) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहन इंगळे, शुभम पवार, अविनाश नाईकनवरे, ऋतिक कवठेकर (सर्व रा. वडकी), नन्या हरगुडे, आकाश हरगुडे, अनिकेत पालकर व विघ्नेश यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ही घटना वलवा वस्तीत मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरासमोर काही जण भांडणे करीत होते.
तेव्हा फिर्यादी याने ऋतिक कवठेकर याला त्यांच्या घरासमोर भांडणे करु नका, असे सांगितले.
त्यावरुन राग आल्याने त्याने फिर्यादीस फोन करुन शिवीगाळ केली. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री घरासमोर येऊन घरावर दगडफेक केली.
फिर्यादी याच्या अंगावर येऊन अन्या आता तुला मी जिवंत सोडत नाही असे म्हणून त्यांच्यावर कोयत्याने वार केला.
तेव्हा त्याची आजी मध्ये आली असताना आकाश याने तिच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली.
इतरांनी हातातील दगडे त्यांच्या घरावर फेकली. तसेच दरवाजावर, खिडकीवर, रिक्षा व बुलेटवर दगड मारुन
त्यांचे नुकसान केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A gang of gangsters attacked the youth and pelted stones at the house, FIR in Loni Kalbhor Police Station

 

हे देखील वाचा :

Shilpa Shetty | विचित्र जीन्समुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल; ‘उर्फी जावेदकडे तुझे कपडे…’

Sanjay Raut | ‘महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल’ – संजय राऊत

Shambhuraj Desai | महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये याकरिता दौरा पुढे ढकलला; शंभूराज देसाई

Hrishikesh Kanitkar | महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर

 

Related Posts