IMPIMP

Hrishikesh Kanitkar | महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर

by nagesh
Hrishikesh Kanitkar | hrishikesh kanitkar appointed batting coach of indian womens team and ramesh powar to join nca

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : Hrishikesh Kanitkar | बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेपासून ऋषिकेश कानिटकर यांच्या कार्यकाळाला
सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.

 

आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार हे महिला संघाचा भाग नसतील. त्यांच्याकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिरकी गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या निर्णयानुसार एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. (Hrishikesh Kanitkar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर ऋषिकेश कानिटकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, भारताच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होणं ही खरंच गौरवास्पद गोष्ट आहे.
आपल्याकडे अनुभवी आणि तरुण खेळाडू आहेत. हा संघ आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे.
येणाऱ्या काही काळात आपल्यासमोर काही मोठ्या स्पर्धा असणार आहेत आणि येत्या काळात संघाचा आणि फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असणार आहे, असे ऋषिकेश कानिटकर म्हणाले. (Hrishikesh Kanitkar)

 

Web Title :- Hrishikesh Kanitkar | hrishikesh kanitkar appointed batting coach of indian womens team and ramesh powar to join nca

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात रिक्षाचालकांना बनावट कॅलिब्रेशन प्रमाणपत्र; शासनाची फसवणूक करणाऱ्यांना अटक

World Bank Revises Indias GDP Forecast | भारतीय अर्थव्यवस्था सुसाट धावणार, GDP बाबत आनंदवार्ता; महागाई मात्र…

Vanita Kharat | महापरिनिर्वाणदिनी वनिता खरातने केली खास पोस्ट

Pune PMC News | यूज ऍन्ड थ्रो प्लास्टिक प्लेटस, काटे, चमचे वापरावरील निर्बंध हटविले; परंतू उत्पादनांना सीआयपीईटी आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र केले आवश्यक

 

Related Posts