IMPIMP

Pune Crime | अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेला 1 लाखांचा घातला गंडा; खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीतील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | वृद्ध महिलांना गाठून त्यांना तुम्हाला पेन्शन लागली असल्याची बतावणी करुन सरकारी कार्यालयातून पेन्शन (Pension) मिळवून देतो, त्यासाठी अंगावरचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगून तुमचा नंबर लावून येतो, असे सांगून दागिने घेऊन चोरटा पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी हडपसर (Hadapsar) येथे राहणार्‍या एका ७२ वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना ए डी कँप चौकातील (A D Camp Chowk Bhawani Peth Pune) खडकमाळ आळी (Khadakmal Ali Pune) येथील मामलेदार कचेरीत (Mamledar Kacheri, Khadak Mal) ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील ७२ वर्षाच्या महिला ए डी कॅम्प येथे असताना एकाने त्यांची ओळख काढली.
त्यांची विचारपूस करुन तुमच्या मुलांना ओळखतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला (Pune Crime). त्यांना तुम्हाला पेन्शन लागली आहे.
ती मिळवून देतो, असे सांगून त्यांना रिक्षातून खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत आणले.
तेथे त्याने दागिने पाहून तुम्हाला पेन्शन देणार नाहीत, असे सांगून अंगावरचे दागिने काढून पिशवीत ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे या महिलेने त्यांच्या अंगावरील १ लाख २ हजार रुपयांचे ४१ ग्रॅम वजनाचे दागिने काढून पिशवीत ठेवले. त्यानंतर चोरट्याने त्यांना तुमचा नंबर लावून येतो, तुम्ही इथेच थांबा, असे सांगितले. दागिने ठेवलेली पिशवी घेऊन तो कार्यालयात गेला व तेथून पळून गेला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परंतु, कोठे तक्रार करावी याविषयी त्यांना काही कल्पना नव्हती. शेवटी त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जोरे तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | An old woman was robbed of Rs 1 lakh on the pretext of getting a pension Incident in Mamledar Kacheri Khadak Mal Ali

 

हे देखील वाचा :

Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडी, उत्तर भारतातील थंडी मंदावली – IMD

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेससह संजय राऊत यांच्यावर टीका; म्हणाले…

Pune Crime | 2 मेडिकल दुकानदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले; हॉटेलमध्ये शिरुन जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले, कोंढव्यातील घटना

 

Related Posts