IMPIMP

Pune Crime | 2 मेडिकल दुकानदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले; हॉटेलमध्ये शिरुन जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले, कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime | Damage to houses due to rock blasts due to mine blast for riverine wells; The water tank burst in the incident in Kharadi, some people were injured due to stones

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मेडिकल दुकान उशिरापर्यंत उघडे असल्याचा गैरफायदा घेऊन दुकानात शिरुन दुकानदाराला
पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडण्याच्या दोन घटना एकाच दिवसात कोंढव्यात (Kondhwa) घडल्या. तसेच त्याच चोरट्यांनी हॉटेलमध्ये शिरुन तेथील
दोन कामगारांना जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी दिलीप गेनाराम सावलेसा (वय २४, रा. कुल उत्सव सोसायटी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. कोंढव्यात बुधवारी पहाटे पावणेतीन वाजता एका मेडिकल दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडण्याची घटना घडली होती. दिलीप सावलेसा यांचे कोंढव्यात जय अंबे मेडिकल अँड जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. ते व त्यांचे वडिल हे रात्री साडेदहा वाजता दुकानात असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांच्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या दुकानातील गल्ल्यातील ८ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. (Pune Crime)

 

त्यानंतर हे चोरटे उंड्रीतील (Undri) अतुरनगर सोसायटीत गेले. तेथील चिली चँग हॉटेलमध्ये शिरले.
तेथील कामगार जितू पदम बहाद्दुर मगर (वय २८) आणि सुरज चंद्रबहाद्दुर छत्री (वय २०) यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून ८०० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Robbed 2 medical shopkeepers at gunpoint The incident took place in Kondhwa after he broke into a hotel and threatened to kill himself

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा भाव

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 402 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune NCP | पुणे मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा, पण…

 

Related Posts