IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेससह संजय राऊत यांच्यावर टीका; म्हणाले…

by nagesh
Chandrakant Patil | who will perform mahapuja in pandharpur chief minister uddhav thackeray - chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | लोकसभेत (Lok Sabha) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या
वक्तव्यानंतर काँग्रेसने (Congress) राज्यभर आंदोलन सुरू केले आहे तर शिवसेनेचे (Shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील नद्यांमध्ये प्रेते नव्हती, गंगेत दिसली अशा शब्दात टीका केली. त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोरोनाकाळात (Corona) देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले. आणि सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रातच झाले. त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला असा पलटवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना काळात (Corona Crisis) रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही. एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले. इतकंच नाही तर एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. परप्रांतीय मजुरांना विश्वास देण्यात सरकार कमी पडले त्याचा परिणाम म्हणजे मजुरांनी (Labor) पलायन केले. हे पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिले. खरे तर काँग्रेसने या सर्वाचा जाब मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा. त्यांच्याकडे माफीची मागणी करायला हवी होती. असेही ते म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेला हल्ला सहजासहजी घेणार नसल्याचे सांगत पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी रोज उठून धमक्या देणं बंद करावं. सोमय्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पाटील हे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे असे वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावं असेही ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय बोलतो याचे भान बाळगा : अजित पवार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राजकीय (Political) वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचे काम केल्याचा आरोप केला होता.
त्यावरून चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप -प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत.
पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे,
उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | states disgrace over corona highest death chandrakant patils counter attack on shivsena leader and mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 2 मेडिकल दुकानदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले; हॉटेलमध्ये शिरुन जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले, कोंढव्यातील घटना

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा भाव

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 402 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts