IMPIMP

Pune Crime | नारायणगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक; गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथे रोहिदास पाबळे (Rohidas Pable) याचा
धारदार शस्त्राने वार करुन खून (Murder) करणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खंडणी विरोधी
पथक 2 (Anti Extortion Cell) च्या पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा (Pistol) आणि एक जिवंत काडतूस (Cartridge) जप्त (Pune Crime) केले आहे. याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) गुन्हा (FIR) दाखल आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ज्ञानेश्वर श्रीकांत पाबळे Dnyaneshwar Shrikant Pable (वय – 24), दत्तात्रय विश्वनाथ भाकरे Dattatraya Vishwanath Bhakre (वय – 22 दोघे रा. मु. पो. कावळ पिंपरी पो. जांबुत, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची (Pune Criminals) नावे आहे. खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस अमंलदार हे येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerawada Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत असताना दोन व्यक्ती वाडीया बंगला (Wadia Bungalow) बी. आर. टी. बस स्टॉप (BRT Bus Stop) येथे थांबले आहेत. त्यांच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक काडतुस मिळाले. आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी पुर्वीच्या भांडणाच्या रागातून रोहिदास पाबळे (रा. मु. पो. कावळ पिंपरी पो. जांबुत, ता. जुन्नर – Junnar, जि. पुणे) याचा 9 मार्च रोजी रात्री 10.30 च्या सुमारास खून केल्याची माहिती समोर आली. आरोपींनी मयताच्या घराच्या पाठीमागे डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhre),
खंडणी विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक अरविंद माने (Police Inspector Arvind Mane),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे, विजय गुरव, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Arrest of 2 accused in Narayangaon murder case by anti extortion cell of pune police Crime Branch

 

हे देखील वाचा :

Sunny Leone Injured Photo | सनी लिओनीचा ऑपरेशन टेबलवरील जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल, चाहत्यांना चिंता

Multibagger Penny Stocks | 2 महिन्यांपूर्वी गुंतवले असते 1 लाख तर ‘या’ स्टॉकने बनवले असते 8.63 लाख रुपये

Jayant Patil | सत्तांतराचे दावे करणाऱ्यांना जयंत पाटलांचा बोचरा टोला, म्हणाले – ‘उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं…’

 

Related Posts