IMPIMP

Jayant Patil | सत्तांतराचे दावे करणाऱ्यांना जयंत पाटलांचा बोचरा टोला, म्हणाले – ‘उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं…’

by nagesh
Jayant Patil | NCP leader jayant patil taunt BJP leader devendra fadnavis over the kashmir files movie

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनपाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर (Election Results) भाजपमध्ये (BJP) आनंदाचे वातावरण आहे. भाजप नेते आणि कार्यकर्ते ठिकठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) टीकेचे तोफ डागत आहेत. भविष्यात मुंबई (Mumbai) व महाराष्ट्र (Maharashtra) जिंकण्याचा दावाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक नेत्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी असे दावे करणाऱ्या भाजप नेत्यांना बोचरा टोला लगावला आहे. ‘उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं चुकीचं आहे’, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईत विधानभवनात जयंत पाटील (Jayant Patil) बोलत होते. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मायावतींना (Mayawati) यापूर्वी सर्वाधिक मतं पडली आहेत. सर्व पक्ष उत्तर प्रदेशमध्ये एकवटले असते तर नक्कीच विजय झाला असता. भाजपच्या हातातूनही यापूर्वी अनेक राज्य गेली होती, याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

 

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर आरोप केला की, केंद्रीय यंत्रणांवर (Central System) भ्रष्टाचाऱ्यांकडून (Corrupt People) दबाव आणला जात आहे.
यावर जयंत पाटील म्हणाले, यंत्रणांवर दबाव आणण्याचं कारण नाही. पण समन्स (Summons) न देता नवाब मलिक (Nawab Malik) यांना सहा वाजता घेऊन गेले याची आठवण त्यांनी करुन दिली.
भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला काहीच हरकत नाही, मात्र भाजपमधील लोकांवरही कारवाई व्हावी.
आम्ही भाजपची यादी दिली आहे कारवाई व्हावी, असं जाहिर आव्हान त्यांनी दिलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जयंत पाटील पुढे म्हणाले, देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे, त्याचा विरोध करायला हवा, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं.
आता केंद्रीय यंत्रणा आक्रमक होतात की पक्ष हे पहावं लागेल, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

 

Web Title :- Jayant Patil | ncp leader and minister jayant patil taunts devendra fadnavis and other bjp leaders

 

हे देखील वाचा :

Pune NCP | कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या व आढावा बैठक

Heena Khan Glamorous Look | हिना खाननं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोसाठी दिल्या एकापेक्षा एक वरचढ पोज

Summer Care | उन्हाळ्यात डायरियामुळे होऊ शकते डिहायड्रेशन, ‘या’ 4 प्रकारे करा घरगुती उपाय; जाणून घ्या

 

Related Posts