IMPIMP

Pune Crime | मामे बहिणीला चिडविल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरुणावर वार; दत्तवाडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | मामेबहिणीला चिडविल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी तरुणावर वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. याप्रकरणी लक्ष्मीनगरमधील (Laxminagar) एका १७ वर्षाच्या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६९/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन ऊर्फ सॅन्डी नवगिरे (Sachin alias Sandy Navgire), गणेश आणि सॅन्डीच्या मित्रावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादीच्या मामाच्या मुलीला सचिन नवगिरे याने एक महिन्यांपूर्वी चिडविले होते. त्याचा जाब फिर्यादीने विचारल्याने ‘‘मी कोण आहे माहित आहे का?, तुला बघून घेतो व मी कोण आहे तुला दाखवतो,’’ अशी धमकी दिली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फिर्यादी व त्याच्या मावस भावासह १६ जुलै रोजी रात्री पावणे बारा वाजता आंबेडकर वसाहतीत बसला असताना तिघे जण आले.
सचिन नवगिरे याने शिवीगाळ करुन येथे काय करतो असे म्हणल्याने फिर्यादी तेथून निघून जाऊ लागला.
तेव्हा सचिन याने धारधार शस्त्राने त्याच्या पायावर वार केला. मानेवर वार करुन गंभीर जखमी केले.
इतरांनी लाथाबुक्कयांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक निकाळजे (Sub-Inspector of Police Nikalje) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Murder In Dattawadi Police Station Limits

 

हे देखील वाचा :

Shivsena | संजय राऊत ‘बोलबच्चन’ ! ‘मविआ’ची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली, आमदारानं सांगितलं

Pune Crime | ‘इधर धंदा करना है तो मै जब भी आऊंगा पैसे देनेका, नही तो कोयतेसे काट डालूंगा’; कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणार्‍या दोघा गुंडांना अटक

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना केव्हा मिळेल 18 महिन्याचा DA एरियर? ही आहे मोठी अपडेट

 

Related Posts