IMPIMP

Pune Crime | ७ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; चिमुरडीने युक्तीने करुन घेतली स्वत:ची सुटका

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरी परत जाणार्‍या एका ७ वर्षाच्या चिमुरडीला एका नराधमाने जबरदस्तीने पळून नेले. रेल्वे स्थानकाच्या (Railway Station) प्लॉटफॉर्मच्या लगत असलेल्या बंद कार्यालयात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या चिमुरडीने प्रसंगावधान राखत युक्तीने तेथून पळून जाऊन स्वत:ची सुटका केली. (Pune Crime)

 

हा प्रकार ताडीवाला रोड (Tadiwala Road) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ च्या भिंतीलगत कन्स्ट्रक्शन ऑफिसच्या शेजारी आर पी एफ बॅरेकचे समोरील जुने आय ओ डब्ल्युचे बंद असलेल्या ऑफिसमध्ये सोमवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१५/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ७ वर्षाची मुलगी आहे. ती सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडिलांचे हातगाडीवर डब्बा ठेवून परत घरी जात होती. त्यावेळी वाटेत एकाने तिला जबरदस्तीने उचलून बंद असलेल्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. तेथे तिचे कपडे काढले. ती ओरडत असताना तिला मारुन टाकण्याची धमकी (Threat) दिली. तेव्हा या मुलीने आपल्याला लघुशंका आल्याचा बहाणा केला. तेव्हा त्याने तिला बाजूला जाऊन बस असे सांगितले. तिने बाहेर येऊन लघवी करण्याचा बहाणा करुन तेथून पळ काढला. तिने आपल्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे (Assistant Police Inspector Shilpa Lambe) अधिक तपास करीत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Attempted molestation of 7-year-old girl; The little girl managed to free herself

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तपासणीसाठी आलेल्या महिलेचा डॉक्टराने केला विनयभंग; कोंढव्यातील धक्कादायक घटना

Fire In Pune | भवानी पेठेत गोदामाला आग लागून बेकरी साहित्य जळून खाक

Pradeep Patwardhan Passed Away | हसर्‍या चेहर्‍याचा ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धनची चटका लावणारी ‘एक्झीट’; गिरगावातील राहत्या घरी निधन

 

Related Posts