IMPIMP

Pune Crime | मध्यरात्री घरी जाण्यास सांगणार्‍या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न; लोणी काळभोर येथील घटना

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | मध्यरात्री हॉटेलबाहेर थांबलेल्या दोघांना घरी जा असे सांगितल्याने दोघा गुंडांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या (Pune Police) डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विवेक किशोर साळुंखे Vivek Kishore Salunkhe (वय२०) आणि मयुर बबन आंबेकर Mayur Baban Ambekar (वय २८, दोघे रा. मांजरी खुर्द) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई संदीप धुमाळ Police constable Sandeep Dhumal (वय ३१, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५८८/२२) दिली आहे. ही घटना लोणी टोलनाक्याजवळ सोलापूरकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला जनता हॉटेलसमोर गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पोलीस शिपाई आडके हे गस्त घालत होते.
लोणी टोलनाका येथे आले असताना सोलापूरकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला जनता हॉटेलसमोर दोघे
जण मोटारसायकल लावून मोठमोठ्याने आरडाओरडा करुन बाचाबाची करीत होते.
तेव्हा त्यांनी तुम्ही इथून घरी जा असे सांगितले. त्यावर त्यांना राग येऊन विवेक साळुंखे याने आम्ही येथून
जाणार नाही़ तुला काय करायचे ते कर असे म्हणून जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला.
मयूर याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Attempted murder of a policeman who asked him to go home in the middle of the night with a stone on his head; Incident at Loni Kalbhor

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारने लावला ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामाला थांबवण्याचा धडाका

Pune Temperature | पुण्यात ‘या’ हंगामातील सर्वात कमी किमान तापमान

Sanjay Raut | ‘राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता’ – संजय राऊत

Mumbai-Pune Expressway Accident | खोपोलीजवळ भीषण अपघात ! ५ जणांचा मृत्यु, ४ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर

Related Posts