IMPIMP

Pune Crime Branch | होळीच्या दिवशी एफसी रोडवरील नागरिकांवर फुगे मारणारे 2 हुल्लबाज गजाआड; 2 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल (Videos)

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime Branch | होळी सणाच्या (Holi 2024) दिवशी एफ.सी.रोड वर (FC Road Pune) रस्त्याने जाणाऱ्या लोकांवर पाण्याचे फुगे मारून हुल्लडबाजी करणाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करुन हल्लडबाजी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.24) रोजी पोलीसनामा इन्स्टाग्राम पेजवर (Policenama Instagram Page) एफ.सी. रोड वरील वायरल झालेल्या व्हिडिओ मधील इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने युनिट-१ चे अधिकारी व कर्मचारी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. युनिट -१ कडील अमलदार पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे व शशिकांत दरेकर यांनी शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station) व डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीतील सी.सी.टी.व्ही.ची पाहणी (CCTV Footage) करून प्रतीक दत्तात्रय मोरे (वय-21 राहणार कसबा पेठ, पुणे), करण विठ्ठल डावरे (वय 19 रा. कसबा पेठ पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मोटर वाहन कायदा कलम 279, 3,181 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तसेच अल्पवयीन मुलांचे पालक रंगास्वामी मग अण्णा गौडा (वय-५५ वर्ष रा. हडपसर पुणे), धोंडीराम मच्छिंद्र आखाडे (वय-४५ वर्ष रा. कागदी पुरा कसबा पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 3,5,199(A) प्रमाणे फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी डेक्कन पोलिसांच्या (Deccan Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ सुनिल तांबे (ACP Sunil Tambe), यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr PI Shabbir Sayyad), सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (API Avinash Kavathekar), पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर (PSI Ramesh Tapkir) , पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, महेश बामगुडे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, आय्याझ दड्डिकर ,महेश सरतापे यांच्या पथकाने केली आहे.

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची काँग्रेस भवन येथे नियोजन बैठक संपन्न

Related Posts