IMPIMP

Pune Crime | फसवणूक प्रकरणी हॉटेल ‘साहिल’चे नितीन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | FIR against husband and daughter's father in child marriage case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | हॉटेल, इलेक्ट्रीकल, जीम, बांधकाम व्यवसायातील कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठी चांगल्या परतावाचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडल्यानंतर गेल्या ६ वर्षात कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी शैलेंद्र विलासराव पाटील Shailesh Vilasrao Patil (वय ४९ रा. मिरा सोसायटी, शंकरशेठ रोड) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नितीन चंद्रकांत नाईक Nitin Chandrakant Naik (रा. रामसुख अपार्टमेंट, सभाषनगर, शुक्रवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नितीन नाईक यांनी त्यांचे हॉटेल व्यवसाय, ईलेक्ट्रीकल व्यवसाय, जीम व्यवसाय, बांधकाम व्यवसाय इत्यादी व्यवसाय असल्याचे व हॉटेल साहिल (Hotel Sahil) व सिमृत फूड (Simrat Foods) या कंपन्यांचा विस्तार करण्यासाठी गुंतवणुक करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर चांगला परतावा (Good Returns On Investment) देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून ६ लाख ८९ हजार ५८० रुपये घेतले. जून २०१४ मध्ये त्यांनी ही गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर फिर्यादी यांना त्याबदल्यात त्यांना सुरक्षेपोटी ३१ मे २०२१ या तारखेचा धनादेश दिला होता. मात्र, त्यांनी परतावा न देता दिलेल्या रक्कमेचा अपहार (Pune Crime) केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | cheating case registered on hotel sahil’s Nitin Chandrakant Naik in Khadak Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘वसुली’साठी अपहरण करुन 4 दिवस ठेवले डांबून; सिंहगड रोड पोलिसांकडून दोघांना अटक

Modi Government | महाराष्ट्र सरकारला खोटे ठरवण्याचा डाव? मोदी सरकारकडून ‘ते’ वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा

Uttar Pradesh Election 2022 | भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी आमदार ‘समाजवादी पार्टी’त

 

Related Posts