IMPIMP

Bajaj e Scooter Chetak | बजाज दरमहिना 5000 ‘ई-स्कूटर चेतक’ बनवणार, पुण्यात नवीन प्रॉडक्शन लाईनमध्ये उत्पादन सुरू

by nagesh
Bajaj e Scooter Chetak | bajaj will manufacture 5000 bajaj e scooter every month production starts in Akurdi pune

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBajaj e Scooter Chetak | बजाज मोटर्स (Bajaj Motors) दरमहिना 5000 ई-स्कूटर चेतक (e-Scooter Chetak) बनवणार आहे. कंपनीने शुक्रवारी, 10 जूनला पुण्यात आकुर्डी येथील प्रॉडक्शन लाईन लाँच केली. यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन होईल. प्लांटमध्ये वार्षिक कमाल पाच लाख ई-स्कूटरचे उत्पादन होऊ शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बजाज मोटर्सचे सीईओ राजीव बजाज (Rajiv Bajaj, CEO, Bajaj Motors) यांनी म्हटले की, 32 वर्षांपूर्वी आम्ही स्थानिक बाजारासाठी व्हेस्पा बनवत होतो. आता आम्ही ग्लोबल मार्केटसाठी प्रॉडक्ट बनवत आहोत. आमच्या बाईक्स वर्ल्ड क्लास आहेत. आज बजाज जगातील सर्वात व्हॅल्यूएबल कंपनी आहे. त्यांनी म्हटले की, चेतक आम्ही 2019 मध्ये बनवली होती, तेव्हापासून त्यावर काम सुरू होते.

 

बजाज आता केवळ इलेक्ट्रिक व्हेईकलवरच फोकस करणार का, असे विचारल्यावर ते म्हणाले की, असे नाही. आम्ही जगातील अनेक भागात एक्सपोर्ट करतो. असे अनेक मार्केट आहेत जिथे मोठ्या कालावधीपासून फ्यूएलद्वारे चालणार्‍या गाड्यांची मागणी राहणार आहे. इतके की भारतात सुद्धा तज्ज्ञ 2023 पर्यंत 30 टक्केपेक्षा जास्त इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर होण्याचा अंदाज लावू शकत नाहीत. (Bajaj e Scooter Chetak)

 

अचानक दुचाकींची मागणी वाढण्याबाबत बजाज यांनी म्हटले की, सध्या मागणी पूर्ण करण्यात अडचण येत आहे.
आम्ही उत्पादन वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत. आम्हाला सेमी कंडक्टरमुळे सुद्धा अडचणी येत आहेत.
आम्ही मे मध्ये केवळ 2500 गाड्या बनवू शकलो. आम्ही दरमहिना सरासरी 2500 गाड्या बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.
मागील आर्थिक वर्षात सुमारे 9000 चेतक स्कूटरचे उत्पादन आणि विक्री झाली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यांनी म्हटले की, आता प्रत्येक महिन्याला 5000 चेतकचे उत्पादन करणार आहोत.
मात्र, यासाठी थोडा वेळ लागेल. कारण सप्लाय चेनच्या बाबतीत अजूनही काही अडचणी आहेत.
मात्र, आम्हाला घाईत जास्त चेतकचे उत्पादन करायचे नाही. आम्ही ग्राहकांसाठी योग्य स्कूटर बनवण्यावर फोकस करत आहोत.

 

Web Title :- Bajaj e Scooter Chetak | bajaj will manufacture 5000 bajaj e scooter every month production starts in Akurdi pune

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘एक जागा जरी हरलो असलो तरी…’

Chitra Wagh On Thackeray Government | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या – ‘करेक्ट कार्यक्रम, अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर’

Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप नेत्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘…आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के’

 

Related Posts