IMPIMP

Pune Crime | ‘एक्स्ट्रा सर्व्हिस’ च्या नावाखाली मसाज पार्लरमध्ये सुुरु होता वेश्या व्यवसाय; कोरेगाव पार्कमधील गोल्डन ओक स्पावर छापा, मॅनेजरच होता झीरो पोलीस

by nagesh
Pune Pimpri Crime | Police Raid On A One Spa Sangvi Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एस्क्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली मसाज पार्लरमध्ये (Extra Service In Massage Parlour) सुरु
असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) भंडाफोड सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch) केला आहे. कोरेगाव
पार्कमधील (Koregaon Park, Pune) गोल्डन ओक स्पावर (Golden Oak Spa Pune) छापा टाकून तेथे काम करणारे असिस्टंट मॅनेजर,
सुपरवायझर, दलाल अशा ६ जणांना पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. स्पाचे मालक, मॅनेजर अशा ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे (Pune Crime). धक्कादायक बाब म्हणजे या स्पाचा मॅनेजर अमोल दिलीप रामगडे (Amol Dilip Ramgde) हा झीरो पोलीस (Zero Police) म्हणून काम करीत असल्याचे उघडकीस आले आहे. येथील चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून त्यातील एक मणिपूर राज्यातील आहे. (Pune Police Crime Branch SS Cell Raids On Golden Oak Spa In Koregaon Park Pune)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जूनेल हुसेन इलास अली (वय ३२, अस्टिटंट मॅनेजर, रा. विमाननगर, मुळ आसाम), राय सोलोमन (वय २६, दलाल, रा. लिबर्टी सोसायटी, कोरेगाव पार्क, मुळ रा. मणिपूर), विजय सुनिल पवार Vijay Sunil Pawar (वय २२, स्पा सुपरवायझर, रा. कोरेगाव पार्क), स्टिफन खांगबा रांग (वय २५, दलाल, रा. मुंढवा, मुळ मणिपूर), महमंद फुजेल अहमद सीराजिल हक (वय २२, अस्टिटंट मॅनेजर, रा. मुंढवा, मुळ आसाम) आणि काबुल हुसेन अमीर अली चौधरी (वय २६, रा. येरवडा, मुळ आसाम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

अमोल दिलीप रामगडे (वय ४२, स्पा मॅनेजर, रा. मुंढवा) नौशाद शेख (स्पा मालक), सुधीर पाटील (स्पा मालक),
अमित प्रताप डोमले (वय ३४, स्पा मालक, रा. मुकुंदनगर), राजू बाळकृष्ण शेडगे (वय ४५, स्पा मालक, रा. गांधीनगर, डोंबिवली, कल्याण) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

गोल्डन ओक स्पा च्या नावाने वेबपेजवर लोकांना आकर्षित करण्यासाठी उत्तेजक लेख लिहून तो अपलोड केला होता.
स्पामध्ये मालीश व स्पा बरोबरच लोकांना एक्स्ट्रा सर्व्हिसेस या गोंडस नावाखाली महाविद्यालयीन युवतींमार्फत खुल्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार या स्पावर बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.
त्यानंतर छापा टाकून तेथे असलेल्या ६ जणांना अटक करण्यात आली.
या कारवाईत एक दुचाकीसह १ लाख २४ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विशेष म्हणजे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांचे आदेशानुसार या कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांचे एक पथकही सहभागी झाले होते.

 

 

Web Title :- Pune Crime | The prostitution business started in a massage parlour under the name Extra Service The raid on the Golden Oak Spa in Koregaon Park the manager was Zero Police

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यामध्ये (DA) 5 टक्के वाढ निश्चित; जाणून घ्या

Bajaj e Scooter Chetak | बजाज दरमहिना 5000 ‘ई-स्कूटर चेतक’ बनवणार, पुण्यात नवीन प्रॉडक्शन लाईनमध्ये उत्पादन सुरू

NCP Chief Sharad Pawar | राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘एक जागा जरी हरलो असलो तरी…’

 

Related Posts