IMPIMP

Pune Crime | 82 वर्षाच्या आईच्या सह्या घेऊन 46 लाखांची फसवणूक; मुलासह सुनेवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Action taken against bully who threatens even after returning money with 10 percent interest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | कधीही विचारपूस न करणार्‍या मुलगा, सुनेला आपल्या आईला माहेरहून पैसे मिळणार हे समजल्यावर तिच्याकडे येऊन कोर्टाच्या कामाकरीता सह्या लागतात, असे खोटे सांगून ४६ लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर ८२ वर्षाच्या आईची पाणी व लाईट बंद करुन तिचा सांभाळ करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी मुंढवा येथील एका ८२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिची दोन मुले, सुना व नात अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ एप्रिल २०१२ ते ५ डिसेबर २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ज्येष्ठ नागरिक आहेत.
तिची मुले व सुना त्यांची विचारपूस करीत नव्हते. त्यांना माहेरकडून पैसे मिळणार आहेत,
असे समजल्यावर त्यांनी फिर्यादीकडे येऊन विचारपूस करु लागले. फिर्यादी यांना कोर्टाच्या कामाकरीता सह्या लागतात, असे खोटे सांगून फिर्यादी यांच्या सह्या घेतल्या. त्यांच्या खात्यातून ४६ लाख रुपये परस्पर काढून फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादी यांची पाणी व लाईट बंद करुन त्यांचा सांभाळ करण्यास नकार देऊन मानसिक व शारीरीक त्रास दिला. त्यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली़ पोलीस उपनिरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Cheating With Mother For 46 Lacs, FIR On Son And Daughter In Law

 

हे देखील वाचा :

Pune PMC Property Tax | मिळकत करातील 40 टक्के सवलत पूवर्वत करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन हवेतच?

Shambhuraj Desai | “आमची हिंमत पाच महिन्यांपूर्वीच दाखवली”; संजय राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर

Farmer News | गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात पुन्हा सुरू; ‘इतकी’ मदत मिळते

 

Related Posts