IMPIMP

Farmer News | गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात पुन्हा सुरू; ‘इतकी’ मदत मिळते

by nagesh
Farmer News | gopinath munde farmer accident insurance resumed agriculture department orders to verify proposals

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Farmer News | एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्याचे कुटुंब अडचणीत येते. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने सहा वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना सुरू केली होती. या विम्याचा हप्ता महाराष्ट्र शासन भरत होते. मात्र, एप्रिल २०२२ पासून ही विमा योजना बंद झाली होती. राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Farmer Accident Insurance) नव्याने सुरू केली आहे. (Farmer News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही योजना खंडित झाल्याने राज्य पातळीवर हजारो प्रस्ताव मदतीच्या प्रतीक्षेत होते. या प्रस्तावांची तत्काळ पडताळणी करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. या योजनेनुसार अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंत मदत दिली जाते. त्याचबरोबर एखादा अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची मदत संबंधित शेतकऱ्यांना मिळत होती.

 

विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, हिस्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा विषारी जीव चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणत्याही अपघातांचा समावेश करण्यात आला होता. (Farmer News)

 

योजना खंडित झाल्याने फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील ११५ प्रस्ताव संबंधित कृषी विभागाकडे पडून आहेत.
आता ही योजना पुन्हा सुरू झाल्याने पीडितांना पडताळणी करून योजनेचा लाभ देता येईल.
या योजनेस पात्र होण्यासाठी १० ते ७५ वयोगटांतील सात/बारा नावावर असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अर्ज केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांना अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजीकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागतो.
अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पूर्ण प्रस्ताव सादर करावा लागतो.
त्यानंतर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवितात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Farmer News | gopinath munde farmer accident insurance resumed agriculture department orders to verify proposals

 

हे देखील वाचा :

Rahul Dravid | राहुल द्रविडची होणार उचलबांगडी? BCCI घेणार कठोर निर्णय

Devendra Fadnavis | राज्यातील नेत्यांचा दौरा टाळल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री बचावात उतरले; म्हणाले, “त्या दिवशी एखादं आंदोलन होणं योग्य नाही”

Pune ACB Trap | रापमच्या भोर आगार व्यवस्थापकासह चालक 4 हजार रुपये लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts