IMPIMP

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या कोर्टात काय झाला युक्तीवाद

by nagesh
Pune Crime | District and Sessions Court rejects BJP corporator Dhanraj Ghogare's pre-arrest bail application; Find out what's in the cart argument

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | ठेकेदाराचे अपहरण (Kidnapping) करुन त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याची प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेतल्या प्रकरणी पुण्यातील (Pune Crime) भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे (BJP corporator Dhanraj Ghogre) यांच्यासह विनोद माने पाटील, सुरेश तेलंग, आप्पासाहेब चैनागुंडा यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. धनराज घोगरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात (District Sessions Court) अटकपूर्व जामीनासाठी (pre-arrest bail) न्यायालयात दाखल केलेला अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती फिर्यादी यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांनी दिली. (Pune Crime)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

धनराज घोगरे यांनी दाखल केलेल्या अटकपुर्व जामिनाच्या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी ज्यावेळी घटना घडली त्यावेळी धनराज घोगरे हे तिरुपती बालाजी (Tirupati Balaji) येथे गेले होते, असा युक्तीवाद केला.
तर फिर्यादी यांच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवाद करताना घोगरे हे तिरुपती बालाजीला गेले असले तरी त्यांनी दुसऱ्यामार्फत हा गुन्हा केल्याचा युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायालयाने नगरसेवक धनराज घोगरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
अशी माहिती अ‍ॅड. ठोंबरे यांनी दिली. (Pre-arrest bail application rejected)

 

काय आहे प्रकरण

 

फिर्यादी निखील दिवसे (Nikhil Divase) यांना महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 विद्यमान नगरसेवक धनराज घोगरे व त्यांचे साथीदार सुरेश तेलंग,
विनोद माने पाटील यांचे विरुद्ध महानगरपालिका ठेकेदाराचे काम देतो असे आमिष दाखवून निखिल दिवसे कडून 3 लाख घेऊन काम न देता फसवणूक केली.
तसेच हाताने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी 21 ऑक्टोबर रोजी दिवसे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी निखील दिवसे यांना सराईत गुन्हेगार सदा ढावरे (Sada Dhaware) याच्या मार्फत तुषार पाटील Tushar Patil
(विद्यमान नगरसेविकेचे पती) यांचे सांगण्यावरून धनराज घोगरे यांची तक्रार मागे घेण्याकरिता जबरदस्तीने अपहरण केले.
अपहरण करून कोर्टामध्ये घेऊन गेले. निखिल दिवसे वानवडीची केस माघारी न घेतल्यास त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे बरेवाईट करण्याची धमकी देण्यात आली होती.
तसेच केस माघारी न घेतल्यास त्याच्यावर खंडणीची केस करु अशी धमकी (Pune Crime) दिली होती.
त्यावेळी त्यांनी वकिलाकडे जाऊन ॲफिडेव्हीट कर असे सांगितले होते.

त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी, सुरेश तेलंग व धनराज घोगरे यांचे दोन लोक हजर होते त्यावेळी सदा ढावरे व इतर दोन लोकांनी केस माघारी घेण्यासाठी निखिल दिवसेला
गाडीवरून बसून कोर्टामध्ये आणले व ॲफिडेव्हीट करण्यासाठी बळजबरी केली.
परंतु निखिल दिवसे याने लघवीचा बहाणा करून तात्काळ तेथून पळ काढत दत्तवाडी पोलिस स्टेशन (Dattawadi Police Station)
गाठले व नगरसेवक धनराज घोगरे सह सुरेश तेलंग, विनोद पाटील व इतर लोकांविरुद्ध अपहरणाचा तसेच गुन्हा मागे घेण्याकरिता दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title : Pune Crime | District and Sessions Court rejects BJP corporator Dhanraj Ghogare’s pre-arrest bail application; Find out what’s in the cart argument

 

हे देखील वाचा :

Corona Vaccine | खुशखबर ! दिर्घ प्रतीक्षेनंतर अखेर स्वदेशी व्हॅक्सीन Covaxin ला जागतिक पातळीवर मान्यता, मेडिकल जर्नल लान्सेंटकडून शिक्कामोर्तब

Govinda Naam Mera | भेटा विकी कौशलच्या ‘नॉटी गर्लफ्रेंड’ला ! कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर आणि विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’चं पहिलं पोस्टर रिलीज

RRC Railway Recruitment 2021 | 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत विना परीक्षा 1664 पदांसाठी भरती, जाणून घ्या

 

Related Posts