IMPIMP

Pune Crime | पत्नीच्या अपहरणाची केली तक्रार अन् पोलीस तपासात पत्नीचा प्रियकरच निघाला आरोपी; 5 तासात अपहरणाचा बनाव उघड

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

जुन्नर : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पत्नीच्या अपहरणाची तक्रार दिल्यानंतर पोलीस (Pune Police) तपासात धक्कादायक माहिती समोर आली. पत्नीने (Wife) स्वत:च्या प्रियकराच्या (Boyfriend) मदतीने अपहरणाचा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) नारायणगाव (Narayangaon) येथे घडला आहे. पोलिसांनी केवळ 5 तासात हा बनाव (Fake Kidnapping) उघड करुन दोघांना नगरमधून (Ahmednagar) ताब्यात घेतले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या (Narayangaon Police Station) हद्दीत वैदवस्ती येथून दोन अज्ञात व्यक्तींनी 24 वर्षीय विवाहित महिलेला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (Swift Car) जबरदस्तीने पळवून नेल्याची तक्रार विवाहितेच्या पतीने दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे वाहनाचा पूर्ण नंबर शोधून काढला. MH 04 DW 6873 या वाहनाच्या मुळ मालकाची माहिती काढण्यात आली. तसेच ही कार बेल्हा रोडने (Belha Road) नगरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. नगर पोलिसांचे एक पथक तातडीने नगरच्या दिशेने रवाना झाले. (Pune Crime)

 

पोलिसांच्या पथकाने नगरमध्ये राहणाऱ्या गाडी मालकाचा पत्ता शोधून त्यांच्याकडे कारबाबत चौकशी केली. त्यावळी ही कार सकाळी 8.30 वाजता महेश लोखंडे (Mahesh Lokhande) व राहुल कनगरे Rahul Kangare (दोघे रा. राहुरी – Rahuri) हे घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार पुन्हा मालकाला देण्यासाठी येणार असल्याचे समजले. पोलीस पथकाने सापळा रचून चार तासात वाहन क्र. MH 04 DW 6873 व दोघांना ताब्यात घेतले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडे महिलेबाबत माहिती घेऊन तिला ताब्यात घेऊन नारायणगाव येथे घेऊन आले. तिच्याकडे सखोल चौकशी केली असता खरा प्रकार समोर आला. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता हा प्रकार बनाव असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate) करीत आहेत.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मितेश गिट्टे (Addl SP Mitesh Gitte),
उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे (Sub – Divisional Police Officer Mandar Jawale),
सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल,
शैलेश वाघमारे, पोलीस नाईक दिनेश साबळे, होमगार्ड अक्षय ढोबळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | fake kidnapped by wife with the help of boyfriend at junner

 

हे देखील वाचा :

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding | रणबीर कपूरच्या प्रेमात आलिया भट्ट झाली वेडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Sunburn Tips | उन्हात टॅनिंग आणि सनबर्नपासून मिळवा सुटका, करा ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

Deputy Collector Santosh Deshmukh | कोव्हिड काळात परिचारिकांनी निष्ठेने व समर्पण भावनेने काम केले – उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख

 

Related Posts