IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या फरासखान्यातील पोलिसाने दिली ‘दत्तवाडी’च्या पोलिसाची ‘गेम’ करण्यासाठी ‘सुपारी’, सराईत गुन्हेगार गजाआड, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहर पोलिस दलातील फरासखाना पोलिस ठाण्यामधील (Faraskhana Police Station) एका पोलिस कर्मचार्‍याने दत्तवाडी पोलिस ठाण्यामधील (Dattawadi Police Station) दुसर्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या खूनाची सुपारी दिल्याने खळबळ उडाली आहे. सराईत गुन्हेगाराच्या मोबाईल तपासणीवरून (Mobile Verification Recording) ही घटना उघडकीस आली. सराईत गुन्हेगार आणि पोलिस कर्मचार्‍यात ‘डील’ झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. परंतु वेळीच दत्तवाडी पोलिसांनी कट हाणून पाडला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार योगेश प्रल्हाद आडसूळ Yogesh Pralhad Adasul (35, रा. कोहेपडळ रेल्वे गेट जवळ, एकता कॉलनी, हडपसर) याला अटक (Arrested) केली आहे. यामुळं संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

योगेश आडसूळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो नुकताच खुनाच्या गुन्हयातून पॅरोलवर बाहेर आला आहे. पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ (Police
Nitin Dudhal) याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा (FIR in Dattawadi Police Station) दाखल करण्यात आला आहे. नितीन दुधाळ हा फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. पोलिस कर्मचारी दिनेश दोरगे (Police Dinesh Dorge) हे दत्तवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दिनेश दोरगे यांची सुपारी देण्यात आली होती. याबाबत फिर्याद पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील बाळासो लोहार (PSI Swapnil Lohar) यांनी दिली आहे. (Pune Crime)

याबाबत माहिती अशी, पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ आणि दिनेश दोरगे या दोघांत वैयक्तिक कारणातून वाद झाला होता. दुधाळ याने दोरगे यांच्या खूनाची सुपारी सराईत गुन्हेगार योगेश आडसूळ याला दिली होती. दिनेश दोरगे यांचा अपघात घडवून त्यांना कायमचे अपंगत्व आणण्याचा कट आरोपींनी रचला होता असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, यामध्ये दोरगे यांचा मृत्यू झाला तरी दुधाळ हे सर्व पाहून घेणार होता.
दरम्यान, हडपसर येथे नितीन दुधाळ याने आडसूळ याची भेट घेऊन ही सुपारी दिली.
पण, सराईत गुन्हेगारांच्या झाडाझडती दरम्यान अडसूळ याला पोलिसांनी अटक (Arrested) केले.
त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता काही संशयास्पद माहिती पोलिसांच्या होती लागली. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी अधिक तपास दत्तवाडी पोलिस (Dattawadi Police Station) करीत आहेत.

दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर (Senior Police Inspector Krishna Indalkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद डोंगरे (API Prasad Dongre) प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime | Faraskhana policeman Nitin Dudhal Dattawadi Policeman Dinesh Dorge Pune Criminal Yogesh Pralhad Adasul murder conspiracy

 

हे देखील वाचा :

Gold Price | नवीन वर्षात सोने खरेदी करण्याची चांगली संधी, सोन्याच्या किमतीत 6 वर्षात सर्वात मोठी घसरण

Pune Crime | पुण्यातील दुर्दैवी घटना ! 2 वर्षाच्या चिमुकल्याला टँकरने चिरडले

Amla Health Benefits | हिवाळ्यात ’सुपर फ्रुट’ आवळा खाल्ल्याने ‘या’ 5 आजारांमध्ये मिळेल फायदा

 

Related Posts