IMPIMP

Amla Health Benefits | हिवाळ्यात ’सुपर फ्रुट’ आवळा खाल्ल्याने ‘या’ 5 आजारांमध्ये मिळेल फायदा

by nagesh
Amla Health Benefits | amla health benefits try in winter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Amla Health Benefits | आवळा हे औषधी गुणधर्माने समृद्ध फळ आहे. हिवाळ्यात येणारे हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे (Amla Health Benefits). आवळा हा औषधी गुणधर्माचा खजिना आहे, म्हणूनच यास ’सुपर फ्रुट’चा दर्जा मिळाला आहे.

 

आवळा भारतासह आसपासच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते. 100 ग्रॅम ताज्या आवळ्यात 20 संत्र्यांइतके व्हिटॅमिन सी असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आवळ्याची चव तुरट असते, मात्र तरीही आवळ्याचे लोणचे आणि आवळा मुरंब्बा भारतीय घरांमध्ये भरपूर बनवला जातो.

 

हजारो वर्षांपासून आवळा भारतात औषध म्हणूनही वापरला जात आहे. वेबएमडीच्या वृत्तानुसार, आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबत आवळ्याचे सेवन मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे. (Amla Health Benefits)

 

आवळा खाण्याचे फायदे


1. डायबिटिज (Diabetes) –
आवळ्यात शरीरात वेगाने विरघळणारे फायबर भरपूर असते. त्याच्या मदतीने शरीरात साखर शोषण्याची गती कमी होते. यामुळे रक्तातील झपाट्याने वाढणारी साखरही कमी होते. टाईप 2 मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.

 

2. डायजेशन (Digestion) –
बद्धकोष्ठता आणि डायजेशनच्या समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी आवळ्याचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या नियमित सेवनाने इरिटेबल बोवेल सिंड्रोम देखील टाळता येतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरातील इतर पोषक तत्वे शोषून घेण्यासही मदत करते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. डोळे (Eyes) –
आवळ्याचे नियमित सेवन करणे देखील डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
त्यात व्हिटॅमिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी खूप महत्वाचे आहे.
व्हिटॅमिन ए केवळ डोळ्यांसाठीच फायदेशीर नाही तर ते वयासोबत येणारा मॅक्युलर डिजनरेशनचा धोका देखील कमी करते.

 

4. इम्युनिटी (Immunity)-
कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये इम्युनिटीबाबत बरीच जागरुकता आली आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत.
आवळा इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.
यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच पॉलिफेनॉल, अल्कलॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स पुरेशा प्रमाणात असते जे चांगल्या इम्युनिटीसाठी आवश्यक आहे.

 

5. स्मरणशक्ती (Memory) –
आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. आवळ्याचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
यामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढून स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Amla Health Benefits | amla health benefits try in winter

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा’; केंद्रात मंत्री असलेल्या भाजपच्या नेत्यानं दिला पर्याय

Pune Crime | पुण्यात पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून; मोशीमधील धक्कादायक घटना

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

 

Related Posts