IMPIMP

Pune Crime | पुण्यातील दुर्दैवी घटना ! 2 वर्षाच्या चिमुकल्याला टँकरने चिरडले

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील जाधववाडी चिखली येथील मनाला थरकाप करणारी घटना (Pune Crime) समोर आली आहे. येथील सोसायटीत खेळत असलेल्या 2 वर्षाच्या चिमुकल्याला टॅंकरने धडक दिली आहे. या धडकेमध्ये चिमुकल्याचा दुर्दैवीरित्या मृत्यु (Died) झाला आहे. मोहमद अदनान (Mohamed Adnan) (वय 2) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. ही घटना चिखली येथे ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मेनगेटच्या समोर 31 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी रिजाजउद्दीन रोजअली मनियार (Rojali Maniyar) (वय 24, रा.जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार सोमेश मेहकर (Somesh Mehkar) (रा. चिखली), या आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी, फिर्यादीची आई त्यांचा नातू मोहमद अदनान (Mohamed Adnan) याला सायकल खेळण्यासाठी घेऊन जात होत्या. त्यावेळी आरोपी सोमेश मेहकर हा पाण्याचा टॅंकर घेऊन आला. ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मेन गेटच्या समोर आरोपीच्या टॅंकरचा मोहमद (चिमुकला) याच्या सायकलला धक्का लागला. या धक्क्याने मोहमद हा टँकर खाली चिरडला गेला. त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. या घटनेनंतर आरोपी सोमेशने पळ काढला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 2 year old child was crushed tanker death cycling society in pune

 

हे देखील वाचा :

Amla Health Benefits | हिवाळ्यात ’सुपर फ्रुट’ आवळा खाल्ल्याने ‘या’ 5 आजारांमध्ये मिळेल फायदा

CM Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा’; केंद्रात मंत्री असलेल्या भाजपच्या नेत्यानं दिला पर्याय

Pune Crime | पुण्यात पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून; मोशीमधील धक्कादायक घटना

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

 

Related Posts